Take a fresh look at your lifestyle.

मान्सून अपडेट : राज्यातील ‘या’ जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास महत्वाचे; पहा, कोणत्या जिल्ह्यांना मिळालाय अलर्ट

पुणे : आज राज्यात अनेक जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा कमी झाला आहे. मात्र, काही जिल्ह्यात पुढील 24 तासात मुसळधार ते अति मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. राज्यातील कोकण परिसरातील जिल्ह्यात मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. त्याबरोबरच हवामान विभागाने आज 15 जिल्ह्यांना अलर्ट जारी केला आहे. पालघर जिल्ह्यास रेड अलर्ट जारी केला असून या ठिकाणी वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. नंदूरबार, धुळे, नाशिक, रायगड, रत्नागिरी आणि कोल्हापूर या सहा जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यात पुढील काही तासात मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज आहे.

Advertisement

मुंबई, पुणे, सातारा, ठाणे, सिंधुदुर्ग, जळगाव, औरंगाबाद आणि जालना या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. या जिल्ह्यात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल असा अंदाज आहे. राज्यात आज पावसाचा फारसा जोर नव्हता. तसेच उद्यापासून अनेक ठिकाणी पाऊस कमी होत जाईल, अशी शक्यता आहे. आज नगर जिल्ह्यात कुठेही फारसा पाऊस पडला नाही. नगर शहरात दिवसभर ढगाळ हवामान होते मात्र, पाऊस पडला नाही. काल मात्र जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस पडला होता.

Advertisement

राज्यात मागील सात ते आठ दिवसांपासून होत असलेल्या पावसामुळे धरणे जवळपास भरली आहेत. नद्याही दुथडी भरुन वाहत आहेत. त्यानंतर आज मात्र पावसाने अनेक ठिकाणी उघडीप दिली आहे. असे असले तरी पुढील 24 तासात काही जिल्ह्यात जोरदार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे काही जिल्ह्यांसाठी पुढील 24 तास महत्वाचे आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply