Take a fresh look at your lifestyle.

म्हणून सरकारने ‘त्या’ बँकांना फटकारले; आदेशाला फसला थेटच हरताळ..!

नवी दिल्ली : पेन्शन स्लीपबाबत सरकारने निश्चित केलेल्या नियमांचे पालन न करणाऱ्या देशातील बँकांना केंद्र सरकारने कडक शब्दांत फटकारले आहे. केंद्र सरकारने पेन्शन स्लीपबाबत जून महिन्यात महत्वाचे आदेश दिले होते. मात्र, बँकांनी या आदेशाकडे दुर्लक्ष केले. पेन्शनधारकांच्या बँक खात्यात पेन्शनचे पैसे जमा झाल्यानंतर त्यांना पेन्शन पावती देण्यात आली नाही. काही बँका पेन्शनची पावती देत आहेत मात्र त्यामध्ये अपूर्ण माहिती देत आहेत. बँकांच्या या कारभाराचा पेन्शनधारकांना मात्र त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर अर्थ मंत्रालयाने या बँकांना फटकारले आहे. त्यामुळे आता पेन्शन स्लिपसाठी पेन्शनधारकांना त्रास होणार नाही, असे अपेक्षित आहे.

Advertisement

यावर्षी जूनमध्ये केंद्र सरकारने पेन्शन जारी करणाऱ्या बँकांना पेन्शनधारकांना पेन्शन स्लिप त्यांच्या मोबाईल क्रमांकावर एसएमएस आणि ईमेलद्वारे पाठवण्याचे आदेश दिले होते. बँकांना ही माहिती पेन्शनधारकांच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर पाठवायची होती. पण बँकांनी या आदेशाचे पालन केले नाही. बँकांच्या या कारभारावर अर्थ मंत्रालयाने नाराजी व्क्त केली आहे.

Advertisement

खर्च विभागातील वरिष्ठ अधिकारी सतीश कुमार गर्ग यांच्या मते, सरकारी आदेश असूनही, पेन्शन वितरक बँका पेन्शन स्लिप देण्यात निष्काळजीपणा करत आहेत. पेन्शन खात्यात जमा झाल्यानंतर, पेन्शनधारकाच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर एसएमएस किंवा ईमेलद्वारे पेन्शन स्लिप पाठवणे आवश्यक आहे. यासाठी व्हॉट्सअॅपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचाही वापर केला जाऊ शकतो. प्रत्येक महिन्याला पेन्शन स्लिप दिली जाईल आणि त्यात मासिक पेन्शन रक्कम, कर कपात इत्यादी महत्वाची माहिती असेल. बँकांना या नियमांची माहिती असणे गरजेचे आहे. फॅमिली पेन्शनच्या बाबतीतही या नियमाचे पालन केले पाहिजे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

बँकांना दोन कॉलममध्ये पेन्शन स्लिप जारी करावी लागेल. यामध्ये पहिल्या कॉलममध्ये कोणत्या महिन्याचे पेन्शन आले आहे आणि दुसऱ्या कॉलममध्ये किती पेन्शन स्लिप देण्यात आल्या आहेत. ही माहिती भरावी लागणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply