Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकार ‘त्यासाठी’ देणार तब्बल 11 हजार कोटी रुपये; सात लाख रोजगार उपलब्ध होणार; पहा, सरकारने घेतलाय ‘हा’ निर्णय

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात देशातील लाखो लोक बेरोजगार झाले. या लोकांना पुन्हा रोजगार मिळवून देऊन देशातील बेरोजगारचा दर कमी करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारने सध्या रोजगार निर्मितीवर भर दिला आहे. काही योजना आणि नवीन प्रकल्पांच्या माध्यमातून रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

Advertisement

आताही मोदी सरकारने देशातील वस्त्रोद्योग क्षेत्राबाबत असाच निर्णय घेतला आहे. आज केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक आयोजित केली होती. यामध्ये विविध निर्णय घेण्यात आले. वस्त्रोद्योग क्षेत्रासाठी पीएलआय योजनेस मंत्रिमंडळाने मंजुरी दिली. ही योजना मानवनिर्मित फायबर विभाग आणि तांत्रिक कापडांसाठी आहे. मानवनिर्मित फायबर कपड्यांसाठी 7 हजार कोटी रुपये तर तांत्रिक कापडांसाठी 4 हजार कोटी असे एकूण 11 हजार कोटी रुपये देण्यात येणार आहेत. याद्वारे देशभरात लाखो रोजगार देखील उपलब्ध होतील, असा दावा सरकारने केला आहे.

Advertisement

केंद्र सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे किमान सात लाख लोकांना रोजगार मिळेल. जगातील अन्य देशांच्या तुलनेत भारतातील कापड उद्योग अजूनही बराच मागे आहे. त्यामुळे या क्षेत्रास प्रोत्साहन देण्याची गरज होती. त्यानुसार निर्णय घेत आज केंद्रीय मंत्रिमंडळाने पीएलआय योजनेस मंजुरी दिली आहे. या योजनेंतर्गत कंपन्यांना भारतात त्यांचे युनिट सुरू करता येईल. तसेच निर्यात करण्यासाठी विशेष सवलती आणि आर्थिक सहाय्यही देण्यात येईल. या योजनेच्या माध्यमातून रोजगाराच्या नवीन संधीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध होतील, असे सांगण्यात आले.

Advertisement

आतापर्यंत 13 क्षेत्रांसाठी पीएलआय योजना मंजूर करण्यात आली आहे. मंत्रिमंडळाकडून मंजुरी मिळाल्यानंतर आता वस्त्रोद्योग मंत्रालय या योजनेसंदर्भात सविस्तर मार्गदर्शक सूचना जारी करणार आहे. गुजरात, उत्तर प्रदेश, तामिळनाडू, महाराष्ट्र, पंजाब, आंध्र प्रदेश, तेलंगाणा आणि ओडिशा या राज्यांना याचा फायदा मिळणार आहे. या योजनेमुळे देशात रोजगार उपलब्ध होतील, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply