Take a fresh look at your lifestyle.

साबण, डिटर्जंटच्या किंमतीत मोठी दरवाढ, ग्राहकांना बसणार मोठा फटका..!

नवी दिल्ली : महागाईच्या काळात सर्वसामान्यांच्या खिशाला आणखी झळ बसणारी बातमी आली आहे. इंधन दरवाढीनंतर साबणांसह काही वस्तूंच्या किंमतीत वाढ करण्यात आली आहे. त्यात सर्फ एक्सेल (Surf Excel), रिन (RIN), लक्स (LUX) आणि इतर वस्तूंचा समावेश आहे. सीएनबीसीच्या अहवालानुसार, फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (एफएमसीजी) जायंट, हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड (HUL) ने लॉन्ड्री आणि बॉडी-क्लींजिंग श्रेणींतील आपल्या उत्पादनांच्या किंमती वाढविल्या आहेत. हिंदुस्थान युनिलिव्हरने गेल्या महिन्यातच डिटर्जंट आणि साबणाच्या किंमतीत 3.5 ते 14 टक्क्यांच्या दरम्यान वाढ केली आहे.

Advertisement

डिटर्जंट श्रेणीतील ‘एचयूएल’ने एक किलो आणि 500 ​​ग्रॅम पॅकसाठी व्हील डिटर्जंटच्या किंमती वाढविल्या आहेत. अहवालानुसार, ही वाढ सुमारे 3.5 टक्के असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे दोन्ही पॅकेटमध्ये 1-2 रुपयांची वाढ होणार आहे. या दरवाढीनंतर, 500 ग्रॅमच्या पॅकेटची किंमत आता 29 रुपये होईल. पूर्वी ती 28 रुपये होती. तसेच पूर्वीच्या 56-57 रुपयांच्या तुलनेत एक किलोसाठी ग्राहकांना आता 58 रुपये मोजावे लागणार आहेत.

Advertisement

पूर्वी 77 रुपयांच्या तुलनेत रिन डिटर्जंट पावडरच्या एक किलोसाठी ग्राहकांना आता 82 रुपये द्यावे लागणार आहेत. कंपनीने लहान पॅकचे वजन आणखी कमी केलेय. रिन डिटर्जंटचा 10 रुपयांचा पॅक 150 ग्रॅमऐवजी आता 130 ग्रॅम झाला आहे.

Advertisement

सर्फ एक्सेल उत्पादनांच्या किंमतीत सर्वाधिक वाढ झालीय. एका किलोच्या पॅकेटमागे 14 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीचा परिणाम लक्स आणि लाइफबॉय यांसारख्या साबणांवरही झाला आहे. मुख्यतः कॉम्बो पॅकच्या किंमती वाढल्या आहेत. दरवाढीनंतर, 100 ग्रॅम, 5 इन 1 पॅक्स लक्स, ज्याची किंमत आधी 120 रुपये होती, आता 128-130 रुपयांपर्यंत वाढणार आहे.

Advertisement

या कंपनीच्या कारवर घसघशीत डिस्काऊंट; ग्राहकांचा होणार मोठा फायदा..!
सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे मार्केट डाऊन; आजही सोन्याचे भाव कमी; पहा, काय आहे मार्केटमधील परिस्थिती

Advertisement
Advertisement

Leave a Reply