Take a fresh look at your lifestyle.

आरबीआयकडून एटीएम, क्रेडिट कार्डच्या नियमांत बदल, खातेदारांवर काय परिणाम होणार पाहा..?

मुंबई : ग्राहकांच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एटीएम व क्रेडिट कार्डच्या नियमांत काही बदल केले आहेत. त्यानुसार डेटा स्टोअरेजशी संबंधित टोकनाइजेशनचे नियम जारी करण्यात आले आहेत. त्यानुसार नागरिकांना आपल्या कार्डची माहिती कोणत्याही थर्ड पार्टी अॅपसोबत शेअर करता येणार नाही.

Advertisement

याआधी फूड डिलिव्हरी अॅप, कॅब सेवा देणाऱ्या कंपन्यांना ही माहिती द्यावी लागत होती. ही माहिती या कंपन्यांच्या अॅपमध्ये माहिती स्टोअर केली असे. त्यातून या माहितीची चोरी होऊन ग्राहकांना आर्थिक फटका बसण्याचा धोका होता. त्यामुळे आरबीआयने हा नवा नियम लागू केला आहे. त्यात ग्राहकांना आपला डेटा शेअर करायचा की नाही, याचे स्वातंत्र्य असेल.

Advertisement

आरबीआयच्या नव्या नियमांनुसार, 1 जानेवारी 2022 पासून कार्ड देणारी बँक आणि कार्ड नेटवर्क वगळता, कुणालाही कार्डची माहिती स्टोअर करता येणार नाही. तसेच याआधी स्टोअर केलेल्या डेटालाही फिल्टर केलं जाणार आहे. मात्र, ट्रांजेक्शन ट्रॅकिंग वा इतर मूलभूत सोयींसाठी संस्था काही मर्यादित माहिती स्टोअर करु शकतात. त्यात कार्ड नंबर आणि कार्डधारकाच्या नावाचे शेवटचे 4 अंक स्टोअर करण्याची सूट देण्यात आली आहे.

Advertisement

आरबीआयचे हे नियम पाळण्याची जबाबदारी कार्ड नेटवर्कची असेल. CoFT मोबाईल, लॅपटॉप, डेस्कटॉप, स्मार्ट वॉच इत्यादींमार्फत केल्या जाणाऱ्या पेमेंटलाही हे नियम लागू असणार आहेत. टोकन सर्व्हिस प्रोव्हायडरकडून देण्यात आलेल्या कार्डला टोकनायजेशनची सुविधा दिली जाईल. टोकनायजेशनसाठी AFA चा वापर होईल.

Advertisement

दरम्यान, ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा बँकांच्या एटीएममधून जास्त वेळा पैसे काढल्यास 1 जानेवारी 2022 पासून नवी शुल्क आकारणी केली जाणार आहे. फ्री लिमिटपेक्षा अधिक वेळा एटीएममधून पैसे काढल्यास आकारण्यात येणाऱ्या शुल्कात वाढ करण्याची परवानगी रिझर्व्ह बॅंकेने आपल्या बँकांना दिलीय. लिमिटपेक्षा अधिकवेळा पैसे काढल्यास आता 21 रुपये शुल्क द्यावे लागणार आहे.

Advertisement

साबण, डिटर्जंटच्या किंमतीत मोठी दरवाढ, ग्राहकांना बसणार मोठा फटका..!
या कंपनीच्या कारवर घसघशीत डिस्काऊंट; ग्राहकांचा होणार मोठा फायदा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply