Take a fresh look at your lifestyle.

आज सोने-चांदी मार्केटचा ट्रेंड बदलला; सोने आणि चांदीचे भाव वाढले; जाणून घ्या, काय आहेत नवीन दर

मुंबई : सोने आणि चांदीचे दर सलग दोन दिवस कमी झाल्यानंतर आज बुधवारी मात्र हा ट्रेंड बदलला आहे. आज या दोन्ही धातूंच्या दरात वाढ नोंदवण्यात आली. मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोने आणि चांदीच्या वायदा किमती 160 रुपयांपर्यंत वाढल्या आहेत. सोने 0.34 टक्के तर चांदीच्या दरात 0.20 टक्के वाढ झाली आहे. याआधी मंगळवारी सोने आणि चांदीचे दर काही प्रमाणात कमी झाले होते. जागतिक बाजारात अमेरिकन डॉलरमध्ये तेजी आणि अमेरिकन बाँडच्या उत्पन्नात वाढ झाल्याचे त्याचा परिणाम सोने आणि चांदीच्या दरावर पडल्याचे दिसून आले.

Advertisement

आज सोन्याच्या वायदे दरात 161 रुपये वाढ झाली. त्यामुळे आता सोन्याचे दर 47 हजार 100 रुपये प्रति दहा ग्रॅम असे झाले आहेत. चांदीच्या वायदे दरात 129 रुपये वाढ झाली. त्यामुळे आता एक किलो चांदीचे दर 64 हजार 750 रुपये असे झाले आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते.

Advertisement

त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजारांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply