Take a fresh look at your lifestyle.

तालिबानच्या ‘त्या’ घोषणेने वाढणार भारताचे टेन्शन; चीन आणि पाकिस्तानला मात्र होणार फायदा

नवी दिल्ली : तालिबानच्या राजवटीत आता अफगाणिस्तान मधील राजकारण वेगाने बदलत चालले आहे. पाकिस्तान आणि चीन पासून नेहमीच दोन हात लांब असणारा अफगाणिस्तान आता मात्र या मुजोर देशांच्या जाळ्यात अडकत चालला आहे. चीनने या परिस्थितीचा फायदा घेण्याची कोणतीही संधी सोडलेली नाही. आता तर चीनच्या महत्वाकांक्षी सीपीइसी प्रकल्पात तालिबानला सहभागी करुन घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. तालिबानच्या प्रवक्त्याने तसे स्पष्टपणे सांगितले आहे. या बदलत्या घडामोडी भारताच्या दृष्टीने मात्र त्रासदायकच ठरणार आहेत.

Advertisement

चायना पाकिस्तान इकॉनॉमिक कॉरिडोर मध्ये सहभागी होण्याची इच्छा तालिबानच्या प्रवक्त्याने व्यक्त केली आहे. चीनच्या ‘बेल्ट अँड रोड इनिशिएटीव्ह’ या महत्वाकांक्षी प्रकल्पाचा ‘सीपीइसी’ हा एक हिस्सा आहे. तसे पाहिले तर हा एक हायवे आणि इंन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प आहे. चीनमधील काशगर प्रांत आणि पाकिस्तानमधील ग्वादर बंदर जोडले जाणार आहेत.

Advertisement

या प्रकल्पात बंदरे, हायवे, मोटरवे, रेल्वे, विमानतळ, पॉवर प्लांटसह अन्य इन्फ्रास्ट्र्क्चर प्रोजेक्ट विकसित केले जाणार आहेत. या प्रकल्पास भारताचा सुरुवातीपासूनच विरोध आहे. कारण, या प्रकल्पातील काही कामे पाकव्याप्त काश्मीर आणि चीनने बळकावलेल्या अक्साई चीन येथे होणार आहेत. भारतास हे मान्य नाही. त्यामुळे भारत या प्रकल्पाचा विरोध करत आहे. असे असले तरी या विरोधाचा फारसा फरक चीन आणि पाकिस्तानवर पडलेला नाही. आता तर तालिबान सारख्या दहशतवादी संघटनाही या प्रकल्पात सहभागी होण्यास तयार आहेत. त्यामुळे चीन आणि पाकिस्तानचे मनसूबे यशस्वी होत असल्याचे दिसत असले तरी भारतास मात्र त्रासदायक ठरणार आहे. आता या बदलत्या घडामोडींवर भारतासह अमेरिका आणि अन्य देश काय प्रतिक्रिया देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement

दरम्यान, अफगाणिस्तानमध्ये खनिजे मोेठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. या खनिजांवर चीनचा डोळा आहे. त्यामुळे तर तालिबानला मान्यता देण्याचाही चीनचा विचार आहे. यामध्ये पाकिस्तानही चीनला मदत करत आहे. त्यामुळे दिवसेंदिवस तालिबान चीनच्या जाळ्यात ओढला जात आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply