Take a fresh look at your lifestyle.

म्हणून अफगाण्यांना पाहिजेत तब्बल 60 कोटी डॉलर्स; पहा, UNO ने काय केलाय प्लान..!

जिनेव्हा : अफगाणिस्तान मध्ये तालिबान्यांना कब्जा केल्यानंतर या देशाची परिस्थिती अत्यंत खराब झाले आहे. हजारो लोकांना देश सोडणे भाग पडले आहे. सध्या अफगाणिस्तान मध्ये मुलभूत सेवा सुविधा, खाद्यान्न आणि अन्य मदतकार्य बंद पडत आहे. लाखो अफगाणी नागरिकांना अन्न आणि आरोग्याबाबत मदतीची अत्यंत गरज आहे. त्यामुळे या लोकांना मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने नियोजनास सुरुवात केली आहे. येत्या 13 सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय सहायता संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनात देशांना मदतीचे आवाहन करण्यात येणार आहे. आजमितीस 1.1 कोटी लोकांना साठ कोटी डॉलर्सची आवश्यकता आहे.

Advertisement

तालिबानच्या संकटामुळे लाखो लोक विस्थापित झाले आहेत. काही जणांनी दुसऱ्या देशांत आश्रय घेतला आहे. मात्र, अजूनही लाखो लोक अफगाणिस्तान मध्येच आहेत. या लोकांना आता तालिबानी राजवटीत अत्यंत त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे या नागरिकांना तत्काळ मदत करणे गरजेचे आहे. अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी जगातील देशांनी आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन संयुक्त राष्ट्रांनी केले आहे.

Advertisement

अफगाणिस्तान मधून अमेरिकेने माघार घेतल्यानंतर आता हा देश तालिबानच्या नियंत्रणात आला आहे. तालिबान लवकरच सरकार गठीत करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. चीन, पाकिस्तान यांसारख्या देशांची मदत तालिबानला मिळत आहे, हे आता जगजाहीर झाले आहे.

Advertisement

आता तर तालिबान चीनच्या महत्वाकांक्षी सीपीइसी प्रकल्पात सहभागी होण्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. असे जर घडले तर अफगाणिस्तान मध्ये चीनचा हस्तक्षेप जास्त वाढणार आहे. या कामी पाकिस्तानचीही मदत मिळेल. हे देश त्यांचे स्वार्थ साधून घेतीलच. मात्र, सर्वसामान्य नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागणार आहे. सध्याची परिस्थिती पाहता असे घडण्याची जास्त शक्यता दिसत आहे. आताही तालिबानच्या काळात येथील नागरिक अत्यंत कठीण परिस्थितीचा सामना करत आहेत. जगालाही याची जाणीव आहे. त्यामुळे या लोकांच्या मदतीसाठी संयुक्त राष्ट्र आणि अन्य संघटना प्रयत्न करत आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply