Take a fresh look at your lifestyle.

राज्यात जोरदार पाऊस बरसणार; हवामान विभागाने आज ‘या’ जिल्ह्यांना दिलाय अलर्ट

मुंबई : मागील काही दिवसांपासून राज्यात पाऊस जोरदार बरसत आहे. काही जिल्ह्यात तर अति मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे हवामान विभागाने पावसाबाबत नवा अंदाज व्यक्त केला आहे. आज कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. तसेच विदर्भात मध्यम ते मुसळधार पाऊस होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. हवामान विभागाने आज राज्यात 16 जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर अन्य जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.

Advertisement

पुणे, सातारा, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, ठाणे, पालघर, नाशिक, जळगाव, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, परभणी, नांदेड, अकोला आणि अमरावती या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. उर्वरीत जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. आज राज्यात दिवसभर अनेक ठिकाणी पावसाचे वातावरण होते. नगर शहरात सकाळपासून ढगाळ हवामान होते. त्यानंतर दुपारच्या सुमारास पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळच्या वेळेस पावसाचा जोर कमी होता.

Advertisement

सध्या मान्सूनच्या कमी दाबाचे क्षेत्र दक्षिणेकडे सरकले आहे. राजस्थानच्या बिकानेरपासून जयपूर, गुणा, गोंदिया ते बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या क्षेत्रापर्यंत सक्रीय झाले आहे. त्यामुळे राज्यात सर्वत्र पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. आज सकाळपासूनच राज्यात अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस होत आहे. काही जिल्ह्यात दुपारनंतर पाऊस सुरू झाला. काही ठिकाणी ढगाळ हवामान आहे. पुढील काही तासात अनेक ठिकाणी जोरदार पाऊस होईल, असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

उद्यापासून मात्र राज्यात पावसाचा जोर काहीसा कमी होण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, घाट परिसर आणि कोकण परिसरातील काही जिल्हे वगळता अन्यत्र हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील तीन दिवसात पाऊस हळूहळू कमी होत जाईल, असे हवामान विभागाने सांगितले.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply