Take a fresh look at your lifestyle.

शेअर बाजारात पहिल्यांदा गुंतवणुक करण्यापूर्वी या टिप्स वाचा, नाहीतर आर्थिक फटका बसण्याची शक्यता..

मुंबई : शेअर बाजाराबद्दल (Share Market) अनेकांच्या मनात उत्सुकता असते. त्यामुळे कोणाच्या सांगण्यावरुन काहीही माहिती नसताना, जादा पैशांच्या अपेक्षने आपण त्यात पैसे गुंतवतो नि मग डोक्याला हात लावण्याची वेळ येते.

Advertisement

सध्या तर शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. मात्र, शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी या बाजाराचे गमक समजून घेणे गरजेचे आहे, अन्यथा आपल्या हातून चुका होऊन मोठ्या नुकसानीला सामोरे जावं लागू शकते. शेअर बाजारात गुंतवणूक करण्यापूर्वी काय काळजी घ्यायला हवी, याबाबत जाणून घेऊ या.

Advertisement

बाजाराची माहिती नसताना पैसे गुंतवू नका
संपूर्ण शेअर मार्केट शिकल्याशिवाय त्यात पैसे गुंतवू नका. मार्केट शिकण्यासाठी इंटरनेटवर बरीच मोफत माहिती उपलब्ध आहे. शेअर बाजारात घुसण्याची तयारी असेल, तर काही चांगल्या ऑनलाईन शेअर मार्केट गुंतवणूक अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेऊ शकता. त्यामुळे तुम्हाला नक्की गुंतवणूक कुठे नि कशी करायची, याबाबत माहिती मिळू शकेल.

Advertisement

सुरुवातीलाच मोठी रक्कम गुंतवू नका
शेअर बाजारात गुंतवणुकीची सुरवात करतानाच एकदम खूप मोठी रक्कम गुंतवू नका. त्यात धोका असू शकतो. सुरुवातीला थोडे पैसे गुंतवा. एकदा अनुभव आला, नफा मिळू लागला, की मग हळूहळू पैसे वाढवा.

Advertisement

फेक कॉल्सकडे दुर्लक्ष केलेलेच बरे..
ट्रेडिंग अकाउंट उघडताच, तुम्हाला फोनवर BUY/SELL कॉलसह मोफत मेसेज मिळू लागतील. पण या जगात कुठेही काहीच मोफत मिळत नाही. मग मल्टी-बॅगर स्टॉकसाठी कोणी अनोळखी विनामूल्य टिप्स का पाठवेल? तुम्हाला मिळालेल्या मोफत टिप्स किंवा शिफारशींवर आंधळेपणाने गुंतवणूक करू नका. त्यातून तुमची फसवणूक होऊ शकते.

Advertisement

अति अपेक्षा ठेवू नका
शेअर बाजार हे क्षणाक्षणाला बदलणारे मार्केट आहे. त्यामुळे इथे गुंतवणूक केली नि लगेच अफाट नफा मिळाला, असे कधी होत नाही. त्यामुळे थोडी गुंतवणूक करून थोडा धीर धरा. इतर अनुभवी लोकांकडून मार्केटच्या काही ट्रेंड्सबद्दल जाणून घ्या. सुरुवातीला थोडाफार नफा मिळवून त्यानंतर जास्त नफा मिळविण्याचा प्रयत्न करा.

Advertisement

जोखीम पत्करू नका
जास्त परतावा मिळविण्यापेक्षा तुमच्या पैशांचं रक्षण करणं महत्वाचं आहे. शेअर्समध्ये गुंतवणूक करताना तुम्ही कधीही अनावश्यक जोखीम घेऊ नका. तसंच तुमचं ‘रिस्क-रिवॉर्ड’ नेहमी संतुलित असेल, याची काळजी घ्या..

Advertisement

या कंपनीच्या कारवर घसघशीत डिस्काऊंट; ग्राहकांचा होणार मोठा फायदा..!
सोन्याच्या हाॅलमार्किंगच्या नियमात बदल होण्याची शक्यता, ग्राहकांवर काय परिणाम होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply