Take a fresh look at your lifestyle.

… तर खासगी कंपन्याकडूनही घेता येईल एलपीजी गॅस; पहा, कोणत्या कंपन्यांनी केलीय तयारी

मुंबई : केंद्र सरकारने खासगीकरण करण्याच्या दिशेने वेगाने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार निर्णय घेण्यात येत आहेत. आताही आगामी काळात एलपीजी गॅस सिलिंडर आता खासगी कंपन्यांकडून सुद्धा घेता येणार आहे. त्याची तयारी सध्या सुरू आहे. आतापर्यंत फक्त तीन सरकारी कंपन्या गॅस वितरणाचे काम करत होत्या. आता मात्र खासगी कंपन्यांना सुद्धा हा अधिकार मिळण्याची शक्यता व्यक्त होत आहे. खासगी कंपन्यांनीही तयारी केली आहे. त्यामुळे भविष्यात खासगी कंपन्या गॅस वितरणाचे काम करताना दिसतील.

Advertisement

गॅस टाकीवर मिळणारे अनुदान कमी होत असल्याने या क्षेत्रात फायदा होण्याचा कंपन्यांचा अंदाज आहे. त्यामुळे या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी काही कंपन्यांनी केल्याची माहिती आहे. यामध्ये रिलायन्स गॅस, गोगॅस, प्युअर गॅस सारख्या काही कंपन्यांची नावे समोर आली आहेत. तसे पाहिले तर या कंपन्या आधीपासूनच गॅस वितरणाच्या क्षेत्रात कार्यरत आहेत. मात्र, आगामी काळात या कंपन्या त्यांच्या व्यवसायात आधिक वाढ करू शकतात. सध्या गॅस टाकीवर अनुदान देणे केंद्र सरकारने कमी केले आहे. मे 2020 पासून अनुदानाचे प्रमाण खूप कमी झाले आहे. सध्या इंडियन ऑइल, बीपीसीएल आणि एचपीसीएल या तीन सरकारी कंपन्यांनाच सब्सिडी रेटवर गॅस सिलिंडर देण्यात येतात. ग्राहकांच्या बँक खात्यात अनुदानाचे पैसे जमा होतात.

Advertisement

काही कंपन्या खासगी कंपन्यांचे गॅस सिलिंडर विकतात. मात्र, सब्सिडी नियमात उद्योग चालणार नाही म्हणून त्याचे स्वरुप सध्या तरी मर्यादीत आहे. पण, आता सरकारकडून अनुदान देणे कमी झाल्याने या कंपन्या आपल्या व्यवसायाचा विस्तार करण्याच्या विचारात आहेत. रिलायन्स गॅस कंपनीने त्यांचे एलपीजी उत्पादन देशांतर्गत बाजारात विकण्यास परवानगी मिळावी, अशी मागणी केंद्र सरकारकडे केली आहे. अन्यही काही कंपन्या घरगुती गॅस सिलिंडर बाजारात विकण्याच्या तयारीत आहेत.

Advertisement

या कंपन्यांचे गॅस टाकीचे दरांचा विचार करुन कोणत्याही एका कंपनीस परवानगी मिळू शकते, असे सांगण्यात येत आहे. याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकार घेणार आहे. याबाबत निर्णय घेतला गेला तर सरकारी कंपन्यांप्रमाणेच या खासगी कंपन्या सुद्धा गॅस वितरणाच्या कामकाजात मोठ्या प्रमाणात दिसतील.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा

Advertisement
Advertisement

Leave a Reply