Take a fresh look at your lifestyle.

सोन्याच्या हाॅलमार्किंगच्या नियमात बदल होण्याची शक्यता, ग्राहकांवर काय परिणाम होणार..?

मुंबई : सोन्यात ग्राहकांची फसवणूक होऊ नये, त्यांना शुध्द सोने मिळावे, यासाठी केंद्र सरकारकडून सोन्याच्या दागिन्यांसाठी हॉलमार्किंग अनिवार्य केले होते. देशभरात 15 जूनपासून हॉलमार्किंगच्या नियमाची अंमलबजावणी करण्यास सुरवात झाली. त्यात जुन्या दागिन्यांसाठीही हॉलमार्किंग बंधनकारक केले होते. मात्र, याबाबत ग्राहक व व्यापाऱ्यांमध्येही पुरेशी स्पष्टता नसल्याचे वारंवार दिसून आले होते.

Advertisement

व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात तक्रारी केल्यानंतर मोदी सरकारने हाॅलमार्किंगच्या नियमात काही बदल करण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. त्यानुसार सोन्याचे जुने दागिने हॉलमार्क करवून घेण्यासाठी आता तीन महिन्यांची मुदतवाढ दिली जाण्याची शक्यता आहे. केंद्र सरकार जून्या दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी 31 नोव्हेंबरपर्यंत अवधी देणार असल्याचे सांगितले जाते.

Advertisement

केंद्रीय वाणिज्य मंत्री पियूष गोयल व सराफ व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाची नुकतीच बैठक झाली. त्यात व्यापाऱ्यांनी गोयल यांच्यासमोर हॉलमार्क यूनिक आईडेंटिफिकेशन नंबर (HUID) आणि इतर तक्रारींचा पाढा वाचला. त्यामुळे केंद्र सरकारकडून HUID संदर्भात तोडगा काढण्यासाठी एखादी समिती स्थापन केली जाण्याची शक्यता आहे.

Advertisement

सध्याच्या HUID प्रणालीच्या माध्यमातून दागिन्यांच्या हॉलमार्किंगसाठी 5 ते 10 दिवसांचा अवधी लागतो. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. हॉलमार्किंगमुळे सोन्यात कोणतीही भेसळ होणार नाही, असे सरकारला वाटते. मात्र, लहान व्यापाऱ्यांना सरकारने केवळ आपल्यावर नजर ठेवण्यासाठी हॉलमार्किंगचा नियम केल्याची भावना आहे.

Advertisement

हॉलमार्किंगची प्रक्रिया प्रचंड वेळखाऊ आहे. अशा पद्धतीने दागिने हॉलमार्क करवून घ्यायचे झाल्यास, यंदा तयार झालेल्या दागिन्यांना हॉलमार्क करवून घेण्यासाठी तीन ते चार वर्षे लागतील, असे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.

Advertisement

हॉलमार्किंग म्हणजे काय?
सोने, चांदी आणि प्लॅटिनमच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण म्हणजे हॉलमार्किंग. देशभरातील हॉलमार्किंग केंद्रांवर हॉलमार्किंगची संपूर्ण प्रक्रिया केली जाते. त्याचे निरीक्षण भारतीय मानक ब्युरो (BIS) द्वारे केले जाते. दागिन्यांवर हॉलमार्क म्हणजे ते शुद्ध असल्याचे प्रमाणित केले जाते.

Advertisement

BIS चा हॉलमार्क हा सोन्यासह चांदीच्या शुद्धतेचे प्रमाणिकरण दर्शवतो. कोणत्याही दागिन्यांवर BIS चिन्ह असणे, म्हणजे ते भारतीय मानक ब्यूरोच्या मानदंडांवर योग्य असल्याचे समजले जाते. त्यामुळे सोनेखरेदी करण्यापूर्वी, दागिन्यांवर BIS चा हॉलमार्क आहे की नाही, याची खात्री करावी. काही ज्वेलर्स तपासणी न करता दागिन्यांवर हॉलमार्किंग करतात. त्यामुळे तो हॉलमार्क खरा की खोटा, याची तपासणी करणे आवश्यक आहे.

Advertisement

भारतीय मानक ब्युरो (BIS) मूळ हॉलमार्क हे त्रिकोणी आकाराचे आहे. त्यावर हॉलमार्किंग सेंटरच्या लोगोसह सोन्याची शुद्धताही लिहिलेली असते. तसेच त्या दागिन्यांच्या उत्पादनाचे वर्ष आणि निर्मात्याचा लोगो देखील त्यावर असतो.

Advertisement

इन्कम रिटर्न भरण्यापासून ज्येष्ठ नागरिकांना सूट, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..
एफडीबाबत रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply