Take a fresh look at your lifestyle.

मूग बाजारभाव : मार्केटमध्ये झालाय हमीभावाचा विचका; राजकीय पक्षांसह सरकारकडून शेतीचा पचका..!

पुणे : सध्या महाराष्ट्र राज्यात करोनाचे धार्मिक राजकारण आणि आरोग्याच्या दुरवस्थेबाबतची सरकारी अनास्था या दोन मुद्द्यांसह शेतीच्या प्रश्नावर सत्ताधारी व विरोधक यांनी मूग गिळून बसण्याची घेतलेली भूमिका हीच मोठी समस्या आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारने जाहीर केलेले हमीभाव शेतकऱ्यांना मिळून देण्याचे भान कोणत्याही राजकीय पक्षाने अजूनही दाखवलेले नाहीत. परिणामी हमीभावाच्या कमी भावाने मुगाची विक्री करण्याची दुर्दैवी परंपरा महाराष्ट्रात कायम आहे.

Advertisement

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना मुंबईचे राजकारण आणि राणे व कागदी वाघ याच मुद्द्यात मश्गुल आहे. सेनेचे मित्रपक्ष राष्ट्रवादी व कॉंग्रेस यांनाही याचे भान नाही. त्याचवेळी मोदींच्या कर्तुत्वाचा टेंभा मिरवणारे महाराष्ट्र भाजप शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर गप्प आहे. केंद्रात शेतकऱ्यांच्या मागण्यांना किंमत न देणारा मोदींचा भाजप महाराष्ट्रातही शेतकरी प्रश्नावर अर्थपूर्ण पद्धतीने गप्प आहे. परिणामी सध्या मूग या डाळवर्गीय पिकाच्या मालाला हमीभाव मिळेनासा झालेला आहे. सध्या मुगाची सरासरी विक्री किंमत 5500 रुपये क्विंटल यापेक्षाही खाली आलेली आहे. काही मोजक्या मार्केटला भाव बरा मिळत आहे.

Advertisement

मंगळवार, दि. 7 सप्टेंबर 2021 रोजीचे बाजारभाव (आकडेवारी : रुपये / क्विंटल) असे :

Advertisement

जिल्हानिहाय बाजारभाव

Advertisement
जिल्हा जात/प्रत आवक कमीत कमी दर जास्तीत कमी दर सर्वसाधारण दर
अहमदनगर 3 5800 6000 5900
अहमदनगर हिरवा 13 4000 7011 6500
अकोला हिरवा 86 4000 6400 5500
अमरावती चमकी 400 3605 7100 6500
बीड हिरवा 10 5451 6736 6390
बुलढाणा हिरवा 1 6000 6000 6000
बुलढाणा चमकी 15 5000 5265 5000
धुळे 8 6700 7601 6881
जळगाव चमकी 39 5779 7001 6701
जालना चमकी 250 4500 7200 5700
लातूर हिरवा 2140 6000 6650 6400
मंबई लोकल 266 7200 9700 9300
नंदुरबार 51 4901 7075 6400
नाशिक लोकल 14 3700 7226 7226
नाशिक हिरवा 143 3835 7328 6535
उस्मानाबाद लोकल 2 5400 5500 5400
उस्मानाबाद हिरवा 75 5901 6601 6000
पुणे हिरवा 33 7200 7800 7550
सांगली लोकल 50 7196 7500 7348
सोलापूर हिरवा 121 5525 6615 6400
ठाणे हायब्रीड 3 8000 8500 8250

 

Advertisement

बाजारसमितीनिहाय बाजारभाव असे :

Advertisement
शहादा 51 4901 7075 6400
दोंडाईचा 8 6700 7601 6881
राहूरी -वांभोरी 3 5800 6000 5900
जालना चमकी 250 4500 7200 5700
जळगाव चमकी 9 5800 6400 5800
अमळनेर चमकी 30 5758 7601 7601
दर्यापूर चमकी 400 3605 7100 6500
मेहकर चमकी 15 5000 5265 5000
सोलापूर हिरवा 12 4600 6470 6200
लातूर हिरवा 2140 6000 6650 6400
अकोला हिरवा 86 4000 6400 5500
पुणे हिरवा 33 7200 7800 7550
मालेगाव हिरवा 55 3599 7500 6380
बीड हिरवा 10 5451 6736 6390
कोपरगाव हिरवा 13 4000 7011 6500
देउळगाव राजा हिरवा 1 6000 6000 6000
नांदगाव हिरवा 63 2901 7280 6725
तुळजापूर हिरवा 75 5901 6601 6000
देवळा हिरवा 25 5005 7205 6500
दुधणी हिरवा 109 6450 6760 6600
कल्याण हायब्रीड 3 8000 8500 8250
सांगली लोकल 50 7196 7500 7348
मुंबई लोकल 266 7200 9700 9300
सटाणा लोकल 14 3700 7226 7226
परांडा लोकल 2 5400 5500 5400

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply