Take a fresh look at your lifestyle.

राज्यात निर्बंधांबाबत मंत्री वडेट्टीवार यांचे महत्वाचे विधान; पहा, नेमके काय म्हटलेय त्यांनी

नागपूर : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी काही ठिकाणी परिस्थिती वेगळी आहे. काही जिल्ह्यात अजूनही रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. निर्बंधांत सवलती दिल्यानेही काही ठिकाणी रुग्ण वाढत असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यातच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका आहे. अशा परिस्थितीत राज्यात पुन्हा निर्बंध जारी केले जाणार का, याबाबत राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी पत्रकार परिषदेत भाष्य केले आहे. राज्यातील लॉकडाऊनबाबत त्यांनी मत व्यक्त केले आहे.

Advertisement

नागपूरसह राज्यात कडक निर्बंध जारी करण्याची चर्चा सध्या नाही. तसेच पुढील काही दिवसात तशी शक्यता दिसत नाही. तिसरी लाट जवळ आली आहे, त्यामुळे आधिक सतर्क राहणे गरजेचे आहे. निर्बंध जारी करण्याबाबत निर्णय मुख्यमंत्री घेतात. मात्र सध्यातरी राज्यात कडक निर्बंध करणार असे काही नाही, असे मंत्री वडेट्टीवार यांनी सांगितले. निर्बंध लागू करायचे किंवा नाही हे रुग्णसंख्येवर अवलंबून आहे. निर्बंध जारी केलेच तर ते संपूर्ण राज्यासाठी असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Advertisement

याआधी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही निर्बंधांबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील असे सांगितले होते. कोरोनाची तिसरी लाट कधी येणार याबाबत निश्चित सांगता येत नाही. तरी देखील राज्य सरकारने नियोजन केले आहे. सध्या राज्यात कोरोनाचा वेग कमी झाला आहे. मात्र पुणे, सातारा, रत्नागिरी, मुंबई आणि नगर जिल्ह्यात रुग्णांची संख्या जास्त आहे. रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे या जिल्ह्यांनी आधिक सतर्क रहावे. नागरिकांनीही काळजी घ्यावी, कोरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.

Advertisement

दरम्यान, देशात आता दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला आहे. मात्र, तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. ऑक्टोबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. देशात तिसरी लाट आली तरी आता या लाटेचा सामना करण्यास पूर्णपणे सक्षम आहोत, असा दावा केंद्र सरकारने केला आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply