Take a fresh look at your lifestyle.

‘या’ कंपनीच्या कारवर घसघशीत डिस्काऊंट; ग्राहकांचा होणार मोठा फायदा..!

मुंबई : सध्या सणासुदीच्या दिवस सुरु असल्याने कोरोनाच्या संकटातही बाजारात ग्राहकांची गर्दी दिसत आहे. ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी अनेक जण ऑफर देत असतात. दसरा-दिवाळीच्या पार्श्वभूमीवर भारतातील कार निर्मात्यांनीही ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी उत्तम ऑफर जाहीर केल्या आहेत. त्यात दक्षिण कोरियन कार कंपनी ह्युंडाई अग्रेसर आहे. या कंपनीने सप्टेंबरमध्ये भारतातील आपल्या वाहनांवर काही मनोरंजक डील ऑफर केल्या आहेत.

Advertisement

ह्युंडईच्या कोणत्या गाड्यांवर ऑफर..?

Advertisement

ह्युंडई सँट्रोच्या सीएनजी व्हेरिएंटवर कोणतीही रोख सवलत नाही. मात्र, या माॅडेलच्या पेट्रोल व्हेरिएंटमध्ये तुम्हाला 10,000 रुपयांची रोख सवलत मिळू शकते. उर्वरित ट्रिमवर 25,000 रुपयांची सूट मिळेल. सँट्रोवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आहे, तर ग्राहक वाहनावर 5000 रुपयांची कॉर्पोरेट सवलतही मिळवू शकतात.

Advertisement

ग्रँड i10 निऑस कारवरदेखील 35,000 रुपयांची रोख सवलत आहे. जी टर्बो पेट्रोल व्हर्जनवर लागू आहे. दुसरीकडे एनए पेट्रोल आणि टर्बो डिझेल व्हर्जनवर 20,000 रुपयांची सूट दिली आहे. सीएनजी व्हर्जनवर कोणतीही सूट नाही. येथे तुम्हाला 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांची कॉर्पोरेट सवलतही मिळत आहे.

Advertisement

ह्युंडई कंपनीच्या ऑरा सेडान कारवर 35,000 रुपयांची घसघशीत सूट मिळत आहे, जी 1.0 लीटर टर्बो पेट्रोल व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. 1.2 लीटर पेट्रोल आणि 1.2 लिटर डिझेल व्हेरिएंटवर 10,000 रुपयांची सूट आहे. सीएनजी व्हेरिएंटवर कोणतीही रोख सवलत नाही. ऑरा 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस आणि 5000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत मिळेल.

Advertisement

Hyundai i20 या कारवर 10,000 रुपयांचा एक्सचेंज बोनस मिळेल, तर 5000 रुपयांची कॉर्पोरेट सवलत आहे. ही सूट फक्त पेट्रोल आयएमटी आणि डिझेल एमटी व्हेरिएंटवर उपलब्ध आहे. तुम्हाला 25,000 रुपयांची रोख सवलत देखील मिळत आहे जी iMT व्हेरिएंटवर लागू आहे. या ऑफर i20 N लाईनअपसाठी नाहीत.

Advertisement

सोन्याच्या हाॅलमार्किंगच्या नियमात बदल होण्याची शक्यता, ग्राहकांवर काय परिणाम होणार..?
इन्कम रिटर्न भरण्यापासून ज्येष्ठ नागरिकांना सूट, मोदी सरकारचा महत्वपूर्ण निर्णय..

Advertisement
Advertisement

Leave a Reply