Take a fresh look at your lifestyle.

कोरोना अपडेट : आरोग्यमंत्र्यांनी ‘या’ 5 जिल्ह्यांना दिलाय सतर्क राहण्याचा इशारा; तिसऱ्या लाटेचा धोका कायम

पुणे : राज्यात कोरोनाचा धोका अजूनही कमी झालेला नाही. रुग्णसंख्या काही प्रमाणात कमी झाली आहे. मात्र, आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात येत आहे. काही जिल्ह्यात रुग्णसंख्या कमी होताना दिसत नाही. त्यामुळे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी याबाबत महत्वाचे विधान केले आहे. आरोग्यमंत्री टोपे आज पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राज्यातील कोरोना परिस्थितीबाबत माहिती दिली. तसेच पुणे, मुंबई, रत्नागिरी, सातारा आणि नगर या जिल्ह्यांनी आधिक सतर्क रहावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

Advertisement

या 5 जिल्ह्यात कोरोना रुग्णसंख्या जास्त आहे. राज्यातील एकूण रुग्णसंख्येपैकी तब्बल 70 टक्के रुग्ण या 5 जिल्ह्यांत आहेत, त्यामुळे या जिल्ह्यांनी आधिक सतर्क राहण्याची गरज आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

या जिल्ह्यांतील रुग्ण संख्या कमी होताना दिसत नाही. दररोज नवे रुग्ण सापडण्याचे प्रमाणही जास्त आहे. त्यामुळे येथील नागरिकांनी आधिक काळजी घ्यावी, या जिल्ह्यांनी कोरोना प्रतिबंधक नियमांचे तंतोतंत पालन करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

Advertisement

तिसरी लाट आलीच तर आपल्याकडे असलेल्या व्यवस्थेच्या आधारे रोखण्याचा प्रयत्न करू. जास्तीत जास्त लसीकरण करण्यावर भर देण्यात येणार आहे जेणेकरुन तिसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी करता येईल. सध्या निर्बंधात वाढ करण्याचा कोणताही विचार नाही. याबाबत मुख्यमंत्री अंतिम निर्णय घेतील, असे टोपे यावेळी म्हणाले.

Advertisement

दरम्यान, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रसार आता बऱ्यापैकी कमी झाला आहे. मात्र, अशातच कोरोनाचे नवे व्हेरिएंट दाखल झाले आहेत. तर, तज्ज्ञांनी तिसऱ्या लाटेचा इशारा दिला आहे. तिसरी लाट येणार असली तरी कधी येणार याबाबत एकमत नाही. मात्र, कोरोनाच्या या संभाव्य लाटेचा धोका लक्षात घेऊन केंद्र आणि राज्य सरकारांनी तसे नियोजन सुरू केले आहे. याचा विचार करून केंद्र सरकारने काही महत्वाचे निर्णय घेतले असून त्यांची अंमलबजावणी सुरू केली आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply