Take a fresh look at your lifestyle.

सलग दुसऱ्या दिवशी सोने-चांदीचे मार्केट डाऊन; आजही सोन्याचे भाव कमी; पहा, काय आहे मार्केटमधील परिस्थिती

मुंबई : सोने आणि चांदीच्या दरात आज सलग दुसऱ्या दिवशी घसरण झाली. जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम म्हणून देशांतर्गत बाजारपेठेत सोने आणि चांदीचे दर कमी होत असल्याचे सांगण्यात येत आहे. मल्टी कमोडिटी एक्सचेंजमध्ये आज सोन्याचे भाव 0.4 टक्क्यांनी कमी झाले आहेत. त्यामुळे सध्या 47 हजार 406 रुपये प्रति दहा ग्रॅम असे सोन्याचे दर आहेत. तसेच चांदीच्या दरात 0.19 टक्के घट नोंदवण्यात आली आहे. सध्या 65 हजार 208 रुपये प्रति किलो असे चांदीचे दर आहेत.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजारांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे. असे असले तरी सोमवारपासून मात्र सोन्याचे दर कमी होत आहेत.

Advertisement

गुडरिटर्न्स या वेबसाईटनुसार आज मंगळवारी राजधानी दिल्ली शहरात 22 कॅरेटसाठी 46 हजार 660 रुपये तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 50 हजार 910 रुपये असा आहे. कोलकाता मध्ये 22 कॅरेटसाठी 46 हजार 950 रुपये, आणि 24 कॅरेटसाठी 49 हजार 650, मुंबई शहरात 22 कॅरेटसाठी 46 हजार 530 रुपये तर 24 कॅरेटसाठी 47 हजार 530 रुपये, चेन्नईमध्ये 22 कॅरेटसाठी 44 हजार 780 रुपये तर 24 कॅरेटसाठी 48 हजार 850 रुपये असे नवीन दर आहेत.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply