Take a fresh look at your lifestyle.

झोमॅटोचा पाय खोलात, आर्थिक तोटा वाढल्याने कंपनी या देशातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत..

नवी दिल्ली : झोमॅटो (Zomato).. ऑनलाइन घरपोच फूड डिलिव्हरी करणारी जगातील एक प्रसिद्ध कंपनी. मात्र, गेल्या काही दिवसांपासून या कंपनीची आर्थिक स्थिती खालावली आहे. दिवसेंदिवस तोटा वाढत चालल्याने कंपनीचा पाय खोलात  चालले आहेत.

Advertisement

चालू वित्त वर्षाच्या पहिल्या तिमाहीत झोमॅटोला 360.7 कोटी रुपयांचे शुद्ध नुकसान झाले. काही दिवसांपूर्वीच कंपनीने सांगितले होतं की, तिमाहीत कंपनीचा एकूण खर्च वाढला असून, आता ते नुकसान 1,259.7 कोटी रुपयांपर्यंत पोहोचले आहे. त्यामुळे झाेमॅटो कंपनीने एका मोठा निर्णय जाहीर केला आहे, तो म्हणजे ब्रिटन आणि सिंगापूर येथील आपला व्यवसाय गुंडाळल्याचे झोमॅटोने भारतीय शेयर बाजाराला कळविले आहे. 

Advertisement

झोमॅटो कंपनी लवकरच ब्रिटेनमधील सब्सिडरी झोमॅटो यूके लिमिटेड आणि सिंगापूरमधील झोमॅटो मीडिया प्रायव्हेट लिमिटेडचा व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.

Advertisement

ब्रिटन आणि सिंगापूरची सहाय्यक कंपनी ही त्यांच्या व्यवसायासाठी महत्त्वपूर्ण नव्हते. त्यामुळे येथील व्यवसाय बंद झाल्यानंतरही झोमॅटोच्या जगभरातील व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नसल्याचे कंपनीने जाहीर केले आहे. कंपनीने ऑगस्ट महिन्यात आपली अमेरिकेतील सहाय्यक कंपनीही बंद केली होती. दुसरीकडे नेक्स्टेबल इंकने आपली भागीदारी 100,000 डॉलरमध्ये विकली होती.

Advertisement

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच झाेमॅटो कंपनीचा आयपीओ (IPO) भारतीय बाजारात आला होता. त्याला सुरुवातीपासूनच मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाल्याने कंपनीचा मोठा फायदा झाला होता. मात्र, कंपनीला काही ठिकाणी व्यवसायात तोटा येत असल्याने अशा ठिकाणचे व्यवसाय बंद करण्याचा निर्णय कंपनीने घेतल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

एफडीबाबत रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार, वाचा..
ऑनलाईन चूना लावणाऱ्या टग्यांचा पर्दाफाश..वाचा पोलिसांची मोठी कारवाई

Advertisement
Advertisement

Leave a Reply