Take a fresh look at your lifestyle.

बाब्बो… अमेरिकेच्या ‘त्या’ एका निर्णयाने सहा लाख लोकांना संकटात टाकले; संयुक्त राष्ट्रांनीही दिलाय ‘हा’ गंभीर इशारा

न्यूयॉर्क : अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर या देशाची परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. हजारो लोकांना त्यांचा देश सोडणे भाग पडले आहे. या संकटामुळे अफगाणिस्तानमधील जवळपास सहा लाख लोक विस्थापित झाले आहेत. तर देशात सध्या जे लोक राहिले आहेत, त्यांनाही अत्यंत गंभीर परिस्थितीस सामोरे जावे लागत आहे. तालिबान्यांना मात्र याचा काहीच फरक पडलेला नाही. अफगाणिस्तान काबीज केल्यानंतर या दहशतवादी संघटनेने आपला खरे रंग दाखवण्यास सुरुवात केली आहे.

Advertisement

देशातील नागरिक मात्र अनेक संकटांचा सामना करत आहेत. अशा संकटाच्या काळात त्यांना मदतीची अत्यंत गरज आहे, असे संयुक्त राष्ट्रांनी म्हटले आहे. अफगाणिस्तानला मदत करण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने जगातील सर्व देशांना आर्थिक मदत देण्यास सांगितले आहे, जेणेकरून तेथील लोकांना मदत करता येईल. संयुक्त राष्ट्र संघाचे प्रवक्ते स्टीफन दुजैरिक यांनी यासाठी 13 सप्टेंबर रोजी एक परिषद आयोजित केली आहे. जेणेकरून अफगाणिस्तानमध्ये मानवतावादी मदत कार्य चालू राहू शकेल. तर दुसरीकडे या देशात खाद्यान्नाचे संकट उभे राहण्याची शक्यता दिसत आहे. कारण, आजच्या परिस्थितीत अफगाणिस्तानमध्ये फक्त या महिन्यापुरतेच अन्न उपलब्ध आहे. त्यामुळे जर मदत तातडीने मिळाली नाही तर येथील परिस्थितीत आणखी खराब होईल, असा इशारा संयुक्त राष्ट्रसंघाच्या जागतिक अन्न कार्यक्रम संस्थेने दिला आहे.

Advertisement

संयुक्त राष्ट्र संघाने अफगाणिस्तान मधील लाखो गरजू लोकांना मदत देणार असल्याचे म्हटले आहे. यूएनने असेही म्हटले आहे की गेल्या दोन दशकांमध्ये येथे झालेली विकासकामे कायम ठेवणे हे तालिबानच्या काळात एक मोठे आव्हान आहे. आजमितीस अफगाणिस्तानमध्ये विस्थापनाचे संकट निर्माण झाले आहे. चालू वर्षातच आतापर्यंत देशात सुमारे सहा लाख लोक विस्थापित झाले आहेत. अशा काळात या लोकांकडे दुर्लक्ष करणे शक्य होणार नाही.

Advertisement

दरम्यान, अमेरिकेने अफगाणिस्तान मधून माघार घेतल्यानंतर आता येथे तालिबानने कब्जा केला आहे. देशातील परिस्थिती अत्यंत खराब झाली आहे. बाँबस्फोट, गोळीबार नेहमीचाच झाला असून आता हा देश पूर्णपणे अस्थिर झाला आहे. जागतिक राजकारणातही वेगाने घडामोडी घडत असून चीन पाकिस्तानसारख्या देशांनी आपला स्वार्थ साधण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. अमेरिकेच्या एका निर्णयामुळे आज अफगाणी नागरिकांना अतोनात नुकसान सहन करावे लागत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply