Take a fresh look at your lifestyle.

मान्सून अपडेट : राज्यात गुरुवारपर्यंत पावसाचा मुक्काम; आज ‘या’ जिल्ह्यांत जोरदार बरसणार

मुंबई : हवामान विभागाने राज्यातील पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. काही दिवसांपासून पावसाने उघडीप दिली आहे. मात्र, आता पुन्हा पावसासाठी अनुकूल वातावरण तयार झाले आहे. मागील दोन दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी जोरदार पाऊस होत आहे. काल रविवारी सुद्धा मुसळधार पाऊस पडला. आता या पावसाबाबत हवामान विभागाने नवा अंदाज व्यक्त केला आहे. राज्यात 9 सप्टेंबरपर्यंत पावसाचा मुक्काम कायम राहणार आहे. या काळात अनेक जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.

Advertisement

मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, नाशिक, पुणे, सातारा आणि रत्नागिरी या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर आजसाठी रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, परभणी, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट दिला आहे. तसेच मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सातारा, पुणे, नाशिक, औरंगाबाद, जालना, अकोला या जिल्ह्यांना 7 सप्टेंबरसाठी ऑरेंज अलर्ट दिला आहे, अशी माहिती हवामान विभागाने दिली.

Advertisement

राज्यात काही दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतली होती. या काळात राज्यात कुठेही फारसा पाऊस झालेला नाही. आता मात्र सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात पाऊस पुन्हा सुरू झाला आहे. तसेही हवामान विभागाने याआधी सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीला पावसाचा अंदाज व्यक्त केला होताच.

Advertisement

आजही उत्तर महाराष्ट्रातील जिल्हे वगळता अन्य काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. राज्यात येत्या 4 ते 5 दिवसांचा हा पावसाचा अंदाज आहे. मान्सून राज्यात पुन्हा परतत असल्याचे हे संकेत आहेत. यानंतर पाऊस कसा राहिल, याबाबत मात्र आताच सांगता येणे शक्य नाही. मात्र, काही दिवसांपासून पावसामध्ये आलेला विस्कळीतपणा कमी होईल.

Advertisement

दरम्यान, राज्यात शनिवारपासून ठिकठिकाणी पाऊस होत आहे. काल रविवारी अनेक जिल्ह्यात जोरदार पाऊस पडला. नगर जिल्ह्यात सुद्धा पावसाने दमदार हजेरी लावली. काल दुपारनंतर नगर शहरात जोरदार पाऊस पडला. तसेच आज सोमवारी सकाळपासूनच शहरात ढगाळ हवामान आहे. तसेही हवामान विभागाने आज काही जिल्ह्यांत पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. त्यामुळे आजही राज्यात जोरदार पाऊस होणार आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply