Take a fresh look at your lifestyle.

आता स्मार्टफोन लवकर खराब होणार नाही; ‘या’ देशाने केलीय ‘ही’ महत्वाची मागणी; जाणून घ्या काय होतील बदल

नवी दिल्ली : आजकाल आपल्याकडील स्मार्टफोनचे आयुष्य जास्त नसते. याचे एक कारण म्हणजे सुरक्षा आणि ऑपरेटिंग सिस्टम अपडेट. खरं तर, सध्याच्या जमान्यात स्मार्टफोन कंपन्या एक किंवा दोन वर्षांसाठी सॉफ्टवेअर अपडेट देतात. मात्र, आता स्मार्टफोनमध्ये अधिक वेळ अपडेट देण्याची मागणी होत आहे. जर्मनीने सर्वात आधी ही मागणी केली आहे. जर्मन सरकारने स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना स्मार्टफोनसाठी किमान 7 वर्षांसाठी अपडेट्स देण्याची मागणी केली आहे.

Advertisement

या मुद्द्यावर फेडरल सरकार युरोपियन कमिशन बरोबर चर्चा करत आहे. स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांनी 7 वर्षांसाठी अपडेट प्रदान करणे आवश्यक आहे, तशा सूचना या कंपन्यांना द्याव्यात, अशी मागणी होत आहे. तसेच, स्मार्टफोन आणि टॅब्लेटचे स्पेअर पार्ट्स रिप्लेस मुदत 7 वर्षांपर्यंत असावी, असे सांगण्यात येत आहे. स्मार्टफोन आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचे स्पेअर पार्टस् कंपन्यांकडून परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून दिले जाऊ शकतात, असेही स्पष्ट करण्यात आले.

Advertisement

जर स्मार्टफोन कंपन्यांनी परवडणाऱ्या दरात स्मार्टफोनचे विविध पार्ट्स आणि दीर्घ कालावधीसाठी म्हणजेच 7 वर्षे अपडेट दिले तर लोक दीर्घकाळ स्मार्टफोन वापरतील. फोन सातत्याने बदलण्याची गरज राहणार नाही. अपडेट देण्याचा कालावधी वाढल्याने हा फायदा होईल, तर दुसरीकडे फोनचे उत्पादनही कमी होईल, असे अहवालात म्हटले आहे. सध्या 40 टक्के लोक 9.0 Pie आधारित स्मार्टफोन वापरत आहेत. यातील बहुतांश स्मार्टफोनला आता अपडेट मिळणे देखील बंद झाले आहे. अशा परिस्थितीत हे स्मार्टफोन वापरासाठी फार सुरक्षित राहिलेले नाहीत.

Advertisement

जर अँड्रॉइड स्मार्टफोन कंपन्यांनी 7 वर्षांपर्यंत अपडेट देण्याचा निर्णय घेतला तर अँड्रॉइडवरून आयफोनकडे वळणाऱ्या मोबाइल युजर्सची संख्या कमी होईल. या निर्णयामुळे मोबाइल डिव्हाइसचे आयुष्य वाढेल. अशा स्थितीत स्मार्टफोनच्या उत्पादन मात्र कमी होण्याची शक्यता आहे. तसेच पर्यावरणाचाही फायदा होईल,  असे सांगण्यात येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply