Take a fresh look at your lifestyle.

… तर ‘या’ राज्यात सगळीकडेच होईल अंधार; पहा, अशा कोणत्या संकटाचा मिळालाय इशारा

चंडीगढ : पंजाब राज्यात अजूनही विजेचे संकट कायम आहे. दोन महिन्यांपासून राज्यातील लोक या संकटाचा सामना करत आहेत. आताही ऐन पावसाळ्याच्या दिवसात विज पुरवठा पुन्हा गायब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याचे महत्वाचे कारण म्हणजे, थर्मल प्रकल्पांना पुरेशा प्रमाणात कोळसा उपलब्ध होत नाही. त्यामुळे जर मागणीच्या तुलनेत कोळसा पुरवठा झाला नाही तर पुढील काही दिवसात पुन्हा विज पुरवठा बंद होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.

Advertisement

याआधी जुलै महिन्यात सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळी तापमानात वाढ झाल्याने विजेची मागणी वाढली होती. मात्र, तितका वीज पुरवठा शक्य नसल्याने वारंवार वीज पुरवठा खंडीत केला जात होता. सरकारी कार्यालयांना एसी बंद ठेवण्याचेही आदेश दिले होते. त्यानंतर काही काळासाठी हा प्रश्न मिटला होता. आता मात्र नव्या संकटाच्या रुपात पुन्हा तसाच प्रश्न निर्माण झाला आहे. आताची परिस्थिती थोडी वेगळी आहे.

Advertisement

सध्या राज्यातील थर्मल प्लांटना कोळसा पुरवठ्यात अडचणी येत आहेत. फक्त दोनच प्लांटना काही प्रमाणात कोळसा मिळाला. त्यामुळे काल रविवारी सुद्धा राज्यातील बहुतांश सरकारी थर्मल प्रकल्प बंदच राहिले. पुढील सात दिवस तरी या परिस्थितीत फरक पडणार नसल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे या काळात राज्यातील नागरिक पुन्हा विजेच्या संकटाने हैराण होणार आहेत. खासगी थर्मल प्रकल्प सुद्धा बंद पडण्याची शक्यता आहे.

Advertisement

राज्यातील थर्मल प्रकल्पांमध्ये सध्या फक्त 2 ते 10 दिवस पुरेल इतकाच कोळसा शिल्लक आहे. सरकारी नियमानुसार थर्मल प्रकल्पात वीज निर्मिती करण्यासाठी 25 ते 30 दिवसांसाठी कोळसा स्टॉक असणे आवश्यक आहे. मात्र, आज तरी अशी परिस्थिती नाही. छत्तीसगड आणि झारखंड राज्यांकडून आणखी आठवडाभर तरी कोळसा पुरवठा विस्कळीत राहणार आहे. त्यामुळे पॉवरकॉमने साडेसहा हजार मेगावाटपेक्षा जास्त वीज बाहेरुन खरेदी केली. 4 रुपये प्रति युनिट या दराने सध्या पॉवरकॉमला वीज खरेदी करण्याची वेळ आली आहे.

Advertisement

मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षार राज्यात विजेच्या वापरात 40 टक्के तर मागणीत 32 टक्के वाढ झाली आहे. त्यामुळे राज्य सरकारचे टेन्शन वाढले आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply