Take a fresh look at your lifestyle.

क्रिप्टोकरन्सीला सोन्याचे दिवस, बिटकाॅईनमध्ये पुन्हा तेजी, इथेरियमने खाल्लाय भाव..!

मुंबई : काही दिवसांपूर्वी मोठ्या प्रमाणात घसरण झाल्याने क्रिप्टोकरन्सीबाबत अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, त्यानंतर या आभासी चलनात होणारी गुंतवणुक मोठ्या प्रमाणात वाढली. त्यातही लोकप्रिय बिटकॉइन आणि इथेरियम या आभासी चलनाला मोठी मागणी असल्याचे दिसत आहे.

Advertisement

मागील २४ तासांतच या दोन्ही आभासी चलनात मोठी वाढ झाली. बिटकॉइनच्या किमतीत ५.८५ टक्के वाढ होऊन त्याचा भाव ५०१७९ डॉलरपर्यंत वाढला. बिटकॉइनचे एकूण बाजार मूल्य ९४३.५५ अब्ज डॉलर इतके वाढले आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात बिटकॉइनने ६५००० डॉलरचा विक्रमी पल्ला गाठला होता. ही विक्रमी पल्ला पुन्हा एकदा गाठण्याच्या दिशेने बिटकाॅईनची वाटचाल सुरु असल्याचे दिसते.

Advertisement

दरम्यान, इथेरियमच्या किमतीतही ६.२६ टक्क्यांची वाढ झाली. एका इथेरियमचा भाव ३७५४.८४ डॉलरवर गेला होता. इथेरियमचे बाजार भांडवल ४४० अब्ज डॉलर्सवर पोचले आहे. डोजेकॉइनचा भाव ०.३० डॉलर असून, त्यात ७.९३ टक्के वाढ झालीय. लिटेकॉइनचा भाव १८४.६३ डॉलर असून, त्यात ६.८४ टक्के वाढ झाली आहे. एका XRP चा भाव १.२७ डॉलर इतका होता. त्यात ६.३४ टक्के वाढ झाली.

Advertisement

कार्डानोचा भाव ३.०४ डॉलर इतका असून, त्यात ९ टक्के वाढ झाली. पोलकॅडोटच्या दरात १.५१ टक्के वाढ झाली. एका कॉइनचा भाव ३२.७६ डॉलर इतका होता. तिथेरचा भाव १ डॉलरवर स्थिर आहे. सोलानाच्या किमतीत १८.२३ टक्के वाढ होऊन त्याचा भाव १३५.०४ डॉलर झाला. Binance Coin च्या किमतीत १.३५ टक्के घसरण झाली. त्याचा भाव ४८७.२५ डॉलर खाली आला होता.

Advertisement

दरम्यान, जागतिक क्रिप्टोकरन्सीजचा विचार केल्यास, त्याची उलाढाल २.१९ लाख कोटी डॉलर्सवर पोचली आहे. विशेष म्हणजे, त्यात एकट्या बिटकॉइनचा वाटा जवळपास ४३ टक्के आहे. मागील २४ तासांत सर्वाधिक ट्रेडिंग इथेरियममध्ये झाल्याचे दिसून येत आहे.

Advertisement

एफडीबाबत रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार, वाचा..
झोमॅटोचा पाय खोलात, आर्थिक तोटा वाढल्याने कंपनी या देशातील व्यवसाय गुंडाळण्याच्या तयारीत..

Advertisement
Advertisement

Leave a Reply