Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे परीक्षेत हस्तक्षेप नाही, वाचा सर्वोच्च न्यायालयाचा महत्वाचा निर्णय…

येत्या 12 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET UG 2021) ची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका शोएब आलम या वकिलांनी केली होती.

दिल्ली : कोणत्याही अभ्यासक्रमासाठी परीक्षा अत्यंत गरजेची असते. मात्र कोरोनामुळे अनेक परीक्षांच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला. तर बारावीसारख्या महत्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. मात्र मुल्यांकणासाठी परीक्षेशिवाय पर्याय नाही. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने परीक्षेबाबत कठोर भुमिका घेतली आहे.

Advertisement

येत्या 12 सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET UG 2021) ची तारीख पुढे ढकलण्याची मागणी करणारी याचिका शोएब आलम या वकिलांनी केली होती. 12 वीच्या वर्गात सुमारे 25 हजार विद्यार्थी सप्टेंबरमध्ये सीबीएसईसह विविध परीक्षांना सामोरे जाणार आहेत. त्यामुळे शोएब आलम यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, वैद्यकीय प्रवेश परीक्षा (NEET UG 2021 ) पुढे ढकलण्यात यावी. कारण सीबीएसईसह इतर अनेक परीक्षा 12 सप्टेंबरच्या आसपास आहेत. त्यामुळे अनेक विद्यार्थी प्रभावीत होतील.

Advertisement

सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमुर्ती ए.एम.खानविलकर, न्यायमुर्ती हृषीकेश रॉय आणि न्यायमुर्ती सी.टी.रविकुमार यांच्या खंडपीठाने याचिकेवर निर्णय देतांना म्हटले की, सीबीएसईच्या 12 वीच्या, खासगी व इतर परीक्षांना बसणाऱ्या विद्यार्थ्यांनी दाखल केलेल्या याचिकेवर विचार करता येणार नाही. कारण विद्यार्थ्यांच्या एका वर्गाच्या गैरसोयीचे कारण देत न्यायालय परीक्षेत हस्तक्षेप करू शकत नाही. त्यामुळे याचिकाकर्ते सक्षम अधिकाऱ्याकडे आपल्या तक्रारी मांडण्यास मोकळे आहेत.

Advertisement

तसेच न्यायालयाने पुढे म्हटले आहे की, केवळ एक टक्के उमेदवार इतर परीक्षेसाठी जातात. तर तुम्ही करत असलेला युक्तीवाद 99 टक्के उमेदवारांना प्रभावीत करत आहे. त्यामुळे या याचिकेवर आम्ही विचार करणार नाही. 1 टक्के विद्यार्थ्यांसाठी संपुर्ण परीक्षा पध्दती थांबवता येणार नाही. आम्हाला अनिश्चितता नको आहे. त्यामुळे वेळेत परीक्षा पार पडायला हव्यात.

Advertisement
Advertisement

Leave a Reply