Take a fresh look at your lifestyle.

इंधनाच्या दरवाढीने केंद्र सरकार मालामाल; चारच महिन्यात मिळालेय कोट्यावधींचे उत्पन्न

नवी दिल्ली : देशात पेट्रोल आणि डिझेलचे दर वेगाने वाढत चालले आहेत. कोरोनाच्या संकटात सुद्धा पेट्रोलियम कंपन्या नागरिकांना कोणताही दिलासा देण्याच्या मूडमध्ये नाहीत, त्यामुळेच तर मनमानी करत इंधनाची दरवाढ करत आहेत. या दरवाढीमुळे देशातील अनेक शहरांत पेट्रोलने शंभरचा आकडा केव्हाच पार केला आहे, डिझेल सुद्धा त्याच दिशेने वाटचाल करत आहे. इंधनाच्या दरवाढीने सर्वसामान्य नागरिकांचा खिसा रिकामा होत आहे तर दुसरीकडे मात्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील करांच्या माध्यमातून बक्कळ कमाई केली आहे. चालू आर्थिक वर्षातील पहिल्या चार महिन्यातच इंधनावरील अबकारी करातून मिळणाऱ्या महसूलात तब्बल 48 टक्के वाढ झाली आहे.

Advertisement

केंद्रीय अर्थ मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार एप्रिल ते जुलै या चार महिन्यांच्या काळात अबकारी कराच्या (एक्साइज ड्युटी) माध्यमातून केंद्र सरकारला एक लाख कोटींपेक्षा जास्त उत्पन्न मिळाले आहे. मागील वर्षात हा आकडा 67 हजार 895 कोटी रुपये इतका होता.

Advertisement

पेट्रोलियम पदार्थांवर सरकारने अनेक प्रकारचे कर लावले आहेत. या करांच्या माध्यमातून सरकारला भरघोस महसूल मिळत आहे. पैसे कमावण्याचा हा हक्काचा मार्ग असल्याने सरकार कोणत्याही परिस्थितीत टॅक्स कमी करण्याचा विचार करत नाही.  आताही कोरोना संकटात लाखो लोक बेरोजगार झाले आहेत, महागाई वाढत चालली आहे, कर्मचाऱ्यांना कमी पगार मिळत आहे, कुटुंबांचे उत्पन्न घटले आहे. तरीसुद्धा इंधनाच्या किमती फार कमी केलेल्या नाहीत. उलट, यंदा तर इंधनावरील करांच्या माध्यमातून सरकारने रेकोर्ड ब्रेक उत्पन्न मिळवले आहे.

Advertisement

इंधनाचे दर कमी करून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी विरोधक करत आहेत. मात्र त्याचा काहीच उपयोग झाला नाही.  उलट, पुढील काही दिवसात दर कमी होणार नाही असे संकेत सरकारने दिले आहेत. केंद्रीय मंत्रीच तसे सांगत आहेत. आज इंधनाच्या दरात जी वाढ होत आहे त्यास आमचे सरकार जबाबदार नाही तर आधीचे काँग्रेस सरकार जबाबदार आहे. त्यांच्या कार्यकाळात काँग्रेसने इंधनाच्या किमती आंतरराष्ट्रीय किंमत निर्देशांका बरोबर जोडल्या होत्या. त्यामुळे आता या किमती कोणत्याही सरकारच्या नियंत्रणात राहिलेल्या नाहीत. काँग्रेस सरकारने जे धोरण बनवले होते त्यामुळेच आज इंधनाचे दर वाढत असल्याचे भाजप खासदार महेश शर्मा यांनी सांगितले होते.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply