Take a fresh look at your lifestyle.

सोने-चांदी मार्केट : आज सोन्याचे दर घसरले, चांदीची चमक मात्र वाढली; पहा, काय आहेत आजचे बाजारभाव

मुंबई: मागील काही दिवसांपासून सोने आणि चांदीच्या दरात वाढ होत असताना आज मात्र हा ट्रेंड मात्र बदलला आहे. आज आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. चांदीच्या भावात मात्र किरकोळ वाढ झाली आहे. आज मल्टी कमॉडिटी एक्सचेंजमध्ये सोन्याच्या वायदे दरात 0.18 टक्क्यांनी घट नोंदवण्यात आली. त्यामुळे आज सोन्याचा भाव 47 हजार 440 रुपये प्रति दहा ग्रॅम असा आहे. तसेच जागतिक बाजारात सोन्याचा दर 1826.65 डॉलर प्रति औंस असा आहे.

Advertisement

देशात सध्याच्या परिस्थितीत सोने आणि चांदीचे दर सारखे बदलत आहेत. कधी कमी तर कधी जास्त असा ट्रेंड सुरू आहे. यामुळे सोन्याचे दर बरेच कमी झाले आहेत. एक वेळी असे वाटत होते की सोने 50 हजारांच्या पुढे जाईल. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता असे होण्याची शक्यता कमीच दिसत आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळी सोने 56 हजारांच्याही पुढे गेले होते. त्यानंतर कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी सुद्धा अशीच परिस्थिती निर्माण झाली होती. सोन्याचे दर वाढत होते. त्यामुळे यावेळी सुद्धा सोने 50 हजरांच्या पुढे जाईल असे वाटत होते. त्यानंतर मात्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा जोर कमी झाला. राज्यांनी लॉकडाऊनचे निर्बंध कमी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे अर्थव्यवस्था पूर्वपदावर येत आहे.

Advertisement

त्यानंतर काही दिवसांपासून सोन्याचे दर वाढत होते. आज मात्र आठवड्याच्या पहिल्या दिवशी दर कमी झाल्याचे दिसून आले. देशात सध्या कोरोना आटोक्यात येत आहे. रुग्णसंख्या कमी होत आहे. मात्र, कोरोनाचा धोका अजून टळलेला नाही. आता तर डेल्टा, डेल्टा प्लस, कप्पा या नव्या व्हेरिएंटने दहशत निर्माण करण्यास सुरुवात केली आहे. यामुळे सुद्धा मागील काही सत्रात सोने आणि चांदीचे दर कमी जास्त होत असल्याचे सांगण्यात येत आहे.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply