Take a fresh look at your lifestyle.

‘या’ आठवड्यात इतके दिवस बँका राहणार बंद; जाणून घ्या, महत्वाची माहिती

मुंबई : सप्टेंबर महिन्यात बरेच दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. रिजर्व बँक ऑफ इंडियाने (आरबीआय) जारी केलेल्या सुट्ट्यांनुसार सप्टेंबरमध्ये बँका 12 दिवस बंद राहतील. यापैकी 5 सुट्ट्या या आठवड्यात आहेत. या पाच सुट्ट्यांमध्ये शनिवार आणि रविवारच्या सुट्ट्यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत जर तुमचे बँकेत महत्त्वाचे काम असेल तर बँक चालू आहे किंवा नाही याची माहिती असणे गरजेचे आहे.

Advertisement

सप्टेंबर महिन्यात 6 दिवस सण आणि 6 दिवस साप्ताहिक सुट्ट्या असतील. 5 सप्टेंबर रोजी रविवारमुळे बँक बंद होती. त्यानंतर आता 8 सप्टेंबर रोजी आसाम राज्यातील गुवाहाटीमध्ये बँका बंद राहतील. सिक्कीम राज्यातील गंगटोकमध्ये 9 सप्टेंबर रोजी बँका उघडणार नाहीत. महिन्याची शेवटची सुट्टी 26 सप्टेंबरला असेल. तथापि, या काळात ऑनलाइन बँकिंग सुरू आहे. यामध्ये कोणत्याही अडचणी येणार नाहीत. प्रभावित होणार नाहीत. 8 सप्टेंबर रोजी गुवाहाटीमधील बँका बंद राहतील. 9 सप्टेंबर रोजी गंगटोकमधील बँका बंद राहतील. 10 सप्टेंबर रोजी अहमदाबाद, बेलापूर, बंगळुरू, भुवनेश्वर, हैदराबाद, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद राहतील. 11 सप्टेंबर – महिन्याचा दुसरा शनिवार सुट्टी असेल. 12 सप्टेंबर रोजी रविवार असल्याने देशभरातील सर्वच बँका बंद राहतील.

Advertisement

सप्टेंबर महिन्यातील सुट्ट्यांची यादी आरबीआयने जाहीर केली आहे. देशात विविध ठिकाणी वेगवेगळ्या दिवसात बँकांना सुट्ट्या आहेत.  त्यामुळे एका राज्यातील बँका बंद असल्या तरी त्या दिवशी अन्य राज्यातील बँका सुरू राहतील.  सुट्ट्यांबाबत लोकांचा गोंधळ होऊ नये, यासाठी कोणत्या दिवशी कोणत्या विभागातील बँका बंद आहेत, याची माहिती देण्यात आली आहे.  त्यानंतर आता नागरिकांनी सुद्धा कोणत्या दिवशी बँक बंद असेल याची माहिती घेणे आवश्यक आहे जेणेकरून गोंधळ होणार नाही आणि बँकेच्या कामकाजाचे योग्य नियोजन करता येईल.

Advertisement

. कृषीरंग | मार्केट अपडेट, शेती-मातीच्या बातम्या, लेख, माहिती आणि जगभरातील न्यूज अपडेट मिळवण्यासाठी आमचे https://t.me/krushirang हे टेलीग्राम चॅनल सबस्क्राईब करा.

Advertisement

. | फेसबुक | ट्विटर | युट्युब | वरही लाईक, फॉलो, सबस्क्राईब आणि शेअर करा.

Advertisement
Advertisement

Leave a Reply