Take a fresh look at your lifestyle.

एफडीबाबत रिझर्व्ह बॅंकेचा मोठा निर्णय, गुंतवणुकदारांवर काय परिणाम होणार, वाचा..

फिक्स्ड डिपॉजिट, अर्थात एफडी वा ठेवी.. अडचणीच्या काळात गाठीशी काहीतरी पैसा असावा, यासाठी अनेक जण बॅंकांमध्ये ठराविक काळासाठी ठेवी ठेवतात. बचत खात्यातून मिळणाऱ्या व्याजापेक्षा एफडीतून जादा व्याजदर मिळत असल्याने अनेकांची पसंती एफडी करण्याकडे असते.

Advertisement

गेल्या काही वर्षात रिझर्व्ह बॅंकेने एफडीवरील व्याजदर कमी केले होते. त्यानंतर रिझर्व्ह बॅंकेने एफडीबाबत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे एफडी करण्याआधी नियम जाणून घेणे आवश्यक आहे, अन्यथा मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. रिझर्व्ह बॅंकेने एफडीच्या नियमांत काय बदल केले आहेत, ते जाणून घेऊ या..

Advertisement

रिझर्व्ह बॅंकेच्या नव्या नियमांनुसार, एफडीचा मॅच्युरिटी पिरियड पूर्ण झाल्यानंतर परताव्याच्या रकमेसाठी क्लेम न केल्यास या रकमेवर मिळणारे व्याज कमी होऊ शकते. हे व्याज सेविंग अकाऊंटवर मिळणाऱ्या व्याजाइतके असेल. साधारणपणे 5 ते 10 वर्षांच्या एफडीसाठी 5 टक्क्यांपेक्षा जास्त व्याज मिळते, तर सेविंग अकाऊंटवर 3 ते 4 टक्के व्याजदर आहे.

Advertisement

समजा, तुम्ही 5 वर्षांच्या मॅच्युरिटी असणाऱ्या एफडीमध्ये पैसे गुंतवले असतील आणि त्याचा कालावधी पूर्ण झाला असेल, तर लगेच ते पैसे काढून घ्या. पैसे काढण्यासाठी न गेल्यास सेविंग अकाऊंटप्रमाणे व्याज मिळेल. त्यात गुंतवणुकदारांचे नुकसान होणार आहे.

Advertisement

जुना नियम काय होता..?

Advertisement

बॅंकांमध्ये केलेली एफडी याआधी मॅच्युअर झाल्यानंतरही तुम्ही पैसे काढण्यासाठी क्लेम केला नाही, तर तेवढ्याच अवधीसाठी बॅंका ती पुढे वाढवत असत. गुंतवणुकदारांना त्याच पद्धतीने व्याजदरदेखील मिळत असे. मात्र, आता तसे होणार नाही. बॅंका परस्पर हा कालावधी वाढविणार नाहीत. त्यामुळे एफडी मॅच्युअर झाल्यावर लगेच क्लेम करा, अन्यथा व्याज कमी मिळू शकते.

Advertisement

ऑनलाईन चूना लावणाऱ्या टग्यांचा पर्दाफाश..वाचा पोलिसांची मोठी कारवाई
पीएफ रकमेवरही मोदी सरकारचा डोळा..! व्याजावर करआकारणी करण्याचा सरकारचा निर्णय, कर्मचाऱ्यावर काय परिणाम होणार..?

Advertisement
Advertisement

Leave a Reply