Take a fresh look at your lifestyle.

…भन्नाटच की ! एकाच घरात वेगवेगळ्या भाषा..वाचा अजब गावची गजब गोष्ट…

जगाच्या पाठीवर असं एक गाव आहे, जिथे एकाच घरात राहणारे महिला आणि पुरूष वेगवेगळी भाषा बोलतात. आफ्रिका खंडात जी विविधता आहे ती इतर कुठेही क्वचितच पहायला मिळते.

दिल्ली : आपल्याकडे दर दहा मैलाला भाषा बदलते असं म्हणतात. कारण प्रत्येक देशात, प्रदेशात, किंवा गावाची शीव बदलली की भाषा किंवा बोलण्याच्या शैलीत फरक जाणवतो. मात्र असं कधी पाहिलंय का, जिथे एकाच छताखाली राहणारे महिला आणि पुरूष दोघांचीही भाषा वेगळी आहेे?

Advertisement

जगाच्या पाठीवर असं एक गाव आहे, जिथे एकाच घरात राहणारे महिला आणि पुरूष वेगवेगळी भाषा बोलतात. आफ्रिका खंडात जी विविधता आहे ती इतर कुठेही क्वचितच पहायला मिळते. तेथे प्राचीन संस्कृतीपासून अनोख्या चालीरीती आणि अनेक समुदाय आढळतात. असाच एक समाज आफ्रिका खंडातील नायजेरीयातील उबांग गावात राहतो. तर हा समुदाय शेतीवर अवलंबून आहे. या अजब समाजाची गजब गोष्ट ही आहे की, येथे महिला आणि पुरूष वेगवेगळी भाषा बोलतात. तर गावातील लोकांना याचा खूप अभिमान आहे तसेच ते या वेगवेगळ्या भाषा बोलण्याच्या परंपरेला देवाचे वरदान मानतात.

Advertisement

या अजब गावात  वेगवेगळ्या भाषा बोलण्याचे कारण म्हणजे, येथे जन्मलेली मुले लहानपणी बहुतेक वेळा त्यांच्या आईसोबत राहतात. त्यामुळे सुमारे दहा वर्षांपर्यंत ही लहान मुले महिलांची भाषा बोलतात. तर त्यानंतर जेव्हा ही लहान मुले मोठी होतात तेव्हा ते पुरूषांमध्ये राहू लागतात. त्यामुळे ते पुरूषांची भाषा बोलतात. त्यामुळे सामान्य गोष्टींची नावेही तेथे स्री आणि पुरूषांसाठी वेगळी असतात.

Advertisement

या गावाच्या बाबतीत गावचे प्रमुख ऑलिवर इबांग म्हणतात की, त्यांच्या आयुष्यात एक अशी वेळ आली आणि त्यांना समजण्यास सुरूवात झाली की, ते योग्य भाषा बोलत नाहीत.त्यांच्या कुटूंबातील किंवा शेजारच्या लोकांनी त्यांना सांगितले की त्यांची वेगळी भाषा आहे. यानंतर तो जसाजसा मोठा होत गेला तसातसा पुरूषांची भाषा शिकायला लागला आणि त्याप्रमाणे बोलायला लागला. ही परंपरा इतकी काटेकोरपणे पाळली जाते की, जर मुल एका वयाच्या नंतर पुरूषांची भाषा बोलत नसेल तर त्यास अपात्रतेचा घोषित केला जातो.

Advertisement

बीबीसीच्या एका रिपोर्टमध्ये मानववंशशास्त्रज्ञ चिची उंडी यांनी म्हटले आहे की, महिला आणि पुरूषांमध्ये अनेक शब्द समान वापरले जातात.

Advertisement

नायजेरियाच्या भाषिक संघटनेच्या मते,  नायजेरीयातील भाषा वाचवल्या नाहीत तर येत्या काही वर्षात नायजेरीयातील 500 क्षेत्रीय भाषांपैकी 50 पूर्णपणे नष्ट होऊ शकतात. या लोकांच्या मुख्य भाषा इग्बो, योरुबा आणि हौसा आहेत. जे लोक विविध समुदायातील दुवा म्हणून काम करतात ते इंग्रजीसुध्दा वापरतात.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply