Take a fresh look at your lifestyle.

त्यामुळे दिल्लीत सुरक्षा वाढवली..वाचा काय आहे कारण…

राजधानी दिल्लीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतात. त्यातच आता गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत. 

दिल्ली : दिल्ली हे शहर देशाची राजधानी आहे. तसेच दिल्लीत राष्ट्रपती भवन ते संसद आणि पंतप्रधान ते विरोधी पक्षाच्या नेत्यांची निवासस्थाने आहेत. त्यामुळे दिल्लीत मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात केलेली असते. मात्र राजधानी दिल्लीत कोणत्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा यंत्रणा डोळ्यात तेल घालून लक्ष देत असतात. त्यातच आता गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आलेले आहेत.

Advertisement

येत्या 6 तारखेला इस्रायली लोकांचे नवीन वर्ष सुरू होते. त्या पार्श्वभुमीवर इस्रायली दुतवासात मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी असते. त्यामुळे या गर्दीचा फायदा घेऊन दहशतवाद्यांकडून इस्रायली दुतावासात घुसून इस्रायली ज्यू नागरीकांना टार्गेट बनवलं जाण्याची शक्यता गुप्तचर यंत्रणांनी व्यक्त केली आहे.

Advertisement

त्यामुळे दिल्लीतील इस्रायली दुतावास परीसरात मोठ्या प्रमाणावर सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. तर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ल्याचे इनपुट मिळाले आहेत. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या सावधानतेच्या इशाऱ्यानंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाली आहे. त्यामुळे इस्रायली दुतावास , वाणिज्य दुतावास, त्यांचे कर्मचारी व त्यांचे घरे आणि त्यांच्याशी संलग्न असलेल्या संघटनांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.

Advertisement

दिल्ली पोलिसांच्या सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुतावास आणि त्याच्या आजूबाजूच्या प्रदेशावर लक्ष ठेवलं जाणार आहे. तसेच पोलिसांव्यतिरीक्त निमलष्करी दलही त्याठिकाणी पाचारण करण्यात आले आहे. त्यासोबतच नवी दिल्लीकडे येणाऱ्या व जाणाऱ्या सर्वठिकाणी पिकेट्स लावून वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply