Take a fresh look at your lifestyle.

धक्कादायक..! म्हणून गॅस टाकीवरचं अनुदान रद्द ; जाणून घ्या तुम्हाला मिळतंय का अनुदान…

1 मार्च 2014 पर्यंत घरगुती गॅसची किरकोळ विक्रीची किंमत दिल्लीत 410.50 रूपये होती.  1 जानेवारीपासून घरगुती गॅस  सिलिंडरच्या किंमतीमध्ये 190 रूपयांची वाढ झाली आहे.

मुंबई : गेल्या काही दिवसांत गॅस सिलींडरच्या किंमतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरीकांच्या नाकीनऊ आले आहे. मात्र  सिलींडरच्या किंमतीत होणारा भ्रष्टाचार रोखण्यासाठी मोदी सरकारने गॅस पुन्हा भरण्याच्या वेळी प्रत्येक सिलींडरची किंमत समान करत त्यावर मिळणारी सबसिडी ग्राहकांच्या खात्यावर पाठवण्यास सुरूवात केली होती. मात्र कोरोनाच्या संकटात वाढत्या गॅसच्या किंमतीने सामान्य नागरीक बेजार झाला असताना गॅस टाकीवर मिळणारे अनुदान कुठे गेले? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

Advertisement

1 मार्च 2014 पर्यंत घरगुती गॅसची किरकोळ विक्रीची किंमत दिल्लीत 410.50 रूपये होती.  1 जानेवारीपासून घरगुती गॅस  सिलिंडरच्या किंमतीमध्ये 190 रूपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे आता दिल्ली आणि मुंबईत गॅस सिलिंडरची किंमत 884.50 रूपये, कोलकातामध्ये 911 रूपये आणि चेन्नईत 900.50 रूपयांवर गेली आहे. मात्र दोन वर्षापुर्वी एलपीजी गॅस सिलिंडरच्या पुनर्भरणासाठी (LPG Cylinder Price) सुमारे 397 रूपयांची सबसिडी उपलब्ध होती. मात्र सध्या गॅस सिलिंडरवर सबसिडी उपलब्ध नाही.

Advertisement

गॅस सिलिंडरच्या किंमतीवरील सबसिडीच्या बाबतील पेट्रोलियम मंत्रालयाने स्पष्टीकरण देतांना म्हटले आहे की, मे 2020 मध्ये अनुदानित आणि विनाअनुदानित गॅस सिलिंडरच्या किंमती समान झाल्या. त्यामुळे या दोन्हींच्या किंमतीत कोणताही फरक राहिला नसल्याने ग्राहकांना कोणत्याही प्रकारची सबसिडी दिली जात नाही.

Advertisement

असं जाणून घ्या तुमच्या खात्यात अनुदान येत आहे की नाही…

Advertisement
  • सर्वप्रथम http://www.mylpg.in पोर्टलवर जा.
  • तेथे तुमचा 17 अंकी एलपीजी आयडी क्रमांक टाका.
  • त्यानंतर नोंदणीकृत मोबाईल नंबर टाका आणि खालील चौकटीत कॅप्च्या कोड टाका.
  • त्यानंतर मोबाईल क्रमांकावर एक ओटीपी येईल, तो ओटीपी दिलेल्या ठिकाणी टाका.
  • पुढील पानावर ई-मेल आयडी भरून पासवर्ड तयार करा.
  • ई-मेलवरील अॅक्टिवेशन लिंकवर क्लिक करा, त्यानंतर तुमचे खाते अॅक्टिव्हेट होईल.
  • त्यानंतर mylpg.in वर लॉगिन करा.
  • LPG खात्याशी जोडलेल्या आधारवर क्लिक करा.
  • यानंतर, बुकिंग हिस्ट्री किंवा सबसिडी ट्रान्सफरचा पर्याय उपलब्ध होईल.

Advertisement

Leave a Reply