Take a fresh look at your lifestyle.

पीएफ रकमेवरही मोदी सरकारचा डोळा..! व्याजावर करआकारणी करण्याचा सरकारचा निर्णय, कर्मचाऱ्यावर काय परिणाम होणार..?

नवी दिल्ली : भविष्यनिर्वाह निधी, अर्थात प्रॉव्हिडंट फंड (Provident Fund) वा थोडक्यात पीएफ.. कोणत्याही नोकरदारासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा शब्द. आयुष्याच्या उतार वयासाठी करण्यात आलेली तजविज… तर, या पीएफबाबत मोदी सरकारने नुकताच एक मोठा निर्णय जाहीर केलाय. त्यामुळे खरे तर पीएफ खातेदारांची धाकधूक वाढली आहे.

Advertisement

मोदी सरकारचा हा निर्णय म्हणजे, आता तुमच्या पीएफवर सरकार कर आकारणी करणार आहे. अर्थात त्यासाठी काही निकषही ठरविले आहेत. त्यानुसार, जर तुमच्या पीएफ खात्यात वर्षाला अडीच लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा होत असल्यास, तुम्हाला मिळणाऱ्या व्याजावर आता सरकारला कर भरावा लागणार आहे.

Advertisement

दरम्यान, सरकारी कर्मचारी, तसेच ज्या कर्मचाऱ्यांच्या खात्यात कंपनीकडून पैसे जमा केले जात नसतील,  तर मात्र अशा कर्मचाऱ्यांसाठी वर्षाला पाच लाख रुपयांपर्यंत सूट मिळणार असल्याची माहिती केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी दिली आहे.

Advertisement

हा निर्णय आणखी समजून घेऊ या… उदा. तुमच्या पगारातून दर महिन्याला पीएफ म्हणून 20833.33 रुपयांपेक्षा अधिक रक्कम कपात होत असेल, किंवा तुमच्या कंपनीकडून काहीही रक्कम जमा केली जात नसतानाही तुमची कपात 41,666.66 पेक्षा अधिक असेल, तरच तुम्हाला या निर्णयाचा विचार करावा लागेल.

Advertisement

देशात सध्या जवळपास सहा कोटी पीएफ खातेधारक आहेत. या निर्णयामुळे त्यांना काही प्रश्न पडले आहेत. ते म्हणजे, कराचा हिशेब कसा लावणार? एकाच पीएफ खात्यात किती रकमेवर कर लागणार, त्याचा नेमका फॉर्म्युला काय असेल? वर्षभरानंतर कोणत्या रकमेवर किती व्याजापर्यंत सूट मिळेल आणि किती रकमेनंतर कर आकारला जाईल? सरकार पूर्ण पीएफ रकमेवर तर कर लावणार नाही ना?

Advertisement

कर्मचाऱ्याच्या पीएफ खात्यात मर्यादेपेक्षा अधिक रक्कम जमा होत असेल, तर दोन पीएफ खाती असणे गरजेचं आहे. एका खात्यात आतापर्यंत कपात झालेली रक्कम आणि व्याजाची पूर्ण रक्कम राहणार आहे. या खात्यात जमा रक्कम किंवा त्यावर लागणारं व्याज करमुक्त असेल. तसेच जी रक्कम या मर्यादेपेक्षा अधिक असेल, ती एका वेगळ्या खात्यात जमा केली जाणार आहे. या खात्यात जमा होणाऱ्या रकमेवर जे व्याज मिळेल, त्यावर दरवर्षी तुमच्या उत्पन्नाच्या स्लॅबनुसार कर आकारला जाणार आहे.

Advertisement

या बदलासाठी केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड म्हणजे सीबीडीटीनं प्राप्तीकर आयकर 1962 मध्ये बदल केलाय. कर लागणारी रक्कम एका खात्यात आणि कर लागणार नाही अशी रक्कम दुसऱ्या खात्यात राहणार असल्याने खातेधारकांसाठी कराचा हिशेब करणं सोपं होईल, असंही तज्ज्ञ सांगतात.

Advertisement

2018-19 या वर्षात 1.23 लाख धनाढ्यांनी त्यांच्या पीएफ खात्यांमध्ये 62,500 कोटी रुपये जमा केल्याचे सांगण्यात येते. देशातील सर्वाधिक श्रीमंत असलेल्या 20 धनदांडग्यांच्या खात्यांमध्ये 825 कोटींची रक्कम जमा आहे. त्यापैकी प्रत्येक जण दरवर्षी 50 लाखांच्या आसपास करमुक्त व्याजाची कमाई करीत असल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जाते.

Advertisement

एलआयसीच्या आयपीओ ची तयारी पूर्ण, मोदी सरकार कमावणार इतके पैसे, वाचा..
आणखी एक उद्याेगसमूह रिलायन्सच्या ताब्यात, महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावर अदानींचा ताबा..!

Advertisement
Advertisement

Leave a Reply