Take a fresh look at your lifestyle.

राॅयल एनफिल्डचे नवे माॅडेल लाँच.. बुलेटचे फिचर्स नि किंमत जाणून घेण्यासाठी वाचा..!

रॉयल एनफिल्ड बुलेटचा थाटच वेगळा.. ही बुलेट चालविण्याचे प्रत्येक तरुणाचे स्वप्न असते. गेल्या २-३ वर्षांपर्यंत बुलेटचे स्वप्न सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर होते, त्याचे कारण म्हणजे किंमत. मात्र, आता ही बुलेट सामान्यांच्या आवाक्यात आली आहे.

Advertisement

सर्वाधिक विक्री होणाऱ्या बाईकपैकी एक म्हणजे, रॉयल एनफिल्ड क्लासिक- 350. या बुलेटचे न्यू जनरेशन कंपनीने 1 सप्टेंबर रोजी लाँच केलं आहे. पूर्णपणे नव्या पद्धतीने ही बुलेट बनविण्यात आली आहे. कंपनीने नव्या जे-प्लॅटफाॅर्मवर ही बुलेट विकसीत केली आहे.

Advertisement

राॅयल एनफिल्ड कंपनीची ही नवी बाईक G2 मॉडेलपासून इंस्पायर्ड आहे. या बाईकच्या हँडलँड डिझाइनपासून फ्लूल टँक, मडगार्ड, कलर कॉम्बिनेशन आणि डिस्क ब्रेकपर्यंत क्लासिक लूक देण्यात आला आहे. शहरातील रस्त्यांपासून ते अॅडव्हेंचर टूरिजम लक्षात घेऊन ही बुलेट बनविण्यात आली आहे.

Advertisement

नव्या बुलेटची वैशिष्ट्ये

Advertisement
  • नव्या क्लासिक 350 मध्ये Meteor 350 cruiser प्रमाणे 349cc फ्लूल इंजेक्टेड इंजिन दिलं आहे.
  • इंजिन 20.2bhp पर्यंत पॉवर आणि 27Nm पर्यंत टॉर्क जनरेट करते.
  • 5 स्पीड गियर बॉक्ससह कंपनीच्या नव्या J आर्किटेक्चरवर बुलेट डेव्हलप केली आहे.
  • आकर्षक लूक आणि दमदार इंजिन क्षमता.
  • एकूण ५ ट्रिम आणि ११ आकर्षक रंगात उपलब्ध
  • कंपनीकडून ३ वर्षापर्यंत स्टँडर्ड वॉरंटी, १ वर्षापर्यंत रोडसाइड असिस्टेंस.

किंमत
या बुलेटची किंमत 1.80 लाख रुपयांपासून सुरू होते. टॉप मॉडेल 2.06 लाख रुपयांपर्यंत असून, ही बुलेट ग्राहकांच्या पसंतीस उतरली आहे.

Advertisement

पीएफ रकमेवरही मोदी सरकारचा डोळा..! व्याजावर करआकारणी करण्याचा सरकारचा निर्णय, कर्मचाऱ्यावर काय परिणाम होणार..?
एलआयसीच्या आयपीओची तयारी पूर्ण, मोदी सरकार कमावणार इतके पैसे, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply