Take a fresh look at your lifestyle.

एलआयसीच्या ‘आयपीओ’ची तयारी पूर्ण, मोदी सरकार कमावणार इतके पैसे, वाचा..

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी असणाऱ्या ‘एलआयसी’च्या ‘आयपीओ’कडे आर्थिक क्षेत्रातील लोकांचे लक्ष लागले आहे. भारताच्या इतिहासातील सर्वात मोठा ‘आयपीओ’ म्हणून ‘एलआयसी’कडे पाहिले जात आहे. त्यासाठी मोदी सरकारही पूर्ण तयारी करीत आहे. सरकारने ‘आयपीओ’संदर्भात कायदेशीर सल्लागार नियुक्त करण्यासाठी अर्ज मागविले होते. त्यासाठी निविदा सादर करण्याची अंतिम तारीख 16 सप्टेंबर आहे.

Advertisement

दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, मोदी सरकार एलआयसीच्या आयपीओच्या माध्यमातून 80,000 कोटी रुपये कमावू शकतात, ज्याचे मूल्य 10-15 लाख कोटी रुपये असू शकते. कोरोनात जगातील पहिल्या 100 विमा कंपन्यांचे एकूण ब्रँड मूल्य 6% ने कमी झाले असताना एलआयसीची ब्रँड मूल्य 6.8 टक्क्यांनी वाढल्याचे समोर आले होते.

Advertisement

मोदी सरकारने एलआयसी आयपीओ नियोजनासाठी गोल्डमॅन सॅक्स ग्रुप इंक, जेपी मॉर्गन चेस अँड कंपनी, आयसीआयसीआय सिक्युरिटीज लिमिटेड, कोटक महिंद्रा कॅपिटल कंपनी, जेएम फायनान्शियल लि., सिटीग्रुप इंक आणि नोमुरा होल्डिंग्ज इंक, यांसह एकूण 10 बीआरएलएम कंपन्यांची नियुक्ती केलीय.

Advertisement

तज्ज्ञांच्या मते, मूल्यमापनानंतर सरकार आयपीओ घेऊन पुढे जाईल. शेअर बाजार नियामक सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) कडे कागदपत्रे सादर केली जातील. एलआयसीच्या मूल्यांकनावर अॅक्चुरियल कंपनी मिलिमन अॅडव्हायझर्स एलएलपी इंडिया काम करीत आहे. Deloitte आणि SBI Caps ची नियुक्ती पूर्व IPO करार सल्लागार म्हणून करण्यात आलीय. 2022 च्या जानेवारी-मार्च तिमाहीत LIC चा IPO आणि स्टॉक एक्सचेंजमध्ये त्याची लिस्टिंग करण्याचा सरकारचा मानस आहे.

Advertisement

दरम्यना, एलआयीसीच्या 1956 च्या कायद्यात सुधारणा करण्यात आली असून, आयपीओसाठी मसुदा प्रॉस्पेक्टस देखील लवकरच दाखल केला जाणार आहे. आयपीओसाठी इतर आवश्यक बाबींचे पालन करण्यासाठी शेअर बाजार नियामक यांच्याशी चर्चा सुरू आहे.

Advertisement

जगातील सर्वात मोठी विमा कंपन्यांचा विचार करायचा झाल्यास इटालियन कंपनी पोस्ट इटालियन पहिल्या स्थानावर, तर स्पेनची मॅपफ्रे दुसऱ्या क्रमांकावर आहे. चीनच्या पिंगएन इन्शुरन्स (चौथ्या) आणि दक्षिण कोरियाच्या सॅमसंग लाईफ इन्शुरन्सपेक्षाही (पाचव्या) एलआयसी (तिसऱ्या) पुढे आहे.

Advertisement

ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत एलआयसी चिनी, जर्मन, फ्रेंच आणि अमेरिकन कंपन्यांच्या मागे आहे. ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत एलआयसी 10 व्या क्रमांकावर आहे आणि तिचे मूल्य 8.65 अब्ज डॉलर्स आहे.

Advertisement

आणखी एक उद्याेगसमूह रिलायन्सच्या ताब्यात, महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावर अदानींचा ताबा..!
मनसे आमदार राजू पाटील म्हणाले, तुम्हाला वसुली सोडून..

Advertisement
Advertisement

Leave a Reply