Take a fresh look at your lifestyle.

आणखी एक उद्याेगसमूह ‘रिलायन्स’च्या ताब्यात, महाराष्ट्रातील व्यापारी मार्गावर अदानींचा ताबा..!

नवी दिल्ली : भारतातील सर्वात मोठ्या रिलायन्स समूहाने काही दिवसांपूर्वीच इन्फाॅर्मेशन सर्च अँण्ड लिस्टिंग क्षेत्रातील जस्ट डायल (Just Dial) ही कंपनी विकत घेतली होती. त्यानंतर रिलायन्स समूहातील रिलायन्स बिग व्हेंचर्सने आणखी एका आयटी कंपनीवर ताबा मिळविला आहे. बंगळुरुस्थित या आयटी कंपनीचे नाव आहे, स्ट्रॅंड लाईफ सायन्सेस (Strand Life Sciences). रिलायन्स समूहाने सेबीला दिलेल्या माहितीनुसार, हा व्यवहार 393 कोटींना झाला आहे.

Advertisement

2000 मध्ये स्ट्रँड लाईफ सायन्सेस कंपनीची स्थापना झाली. 2020-21 या आर्थिक वर्षात कंपनीने 88.70 कोटी रुपयांची उलाढाल केली होती. 2019-20 मध्ये हा आकडा 109.84 कोटी आणि 2018-19 मध्ये 96.60 कोटी रुपये इतका राहिला. गेल्या तीन वर्षांत कंपनीचा निव्वळ नफा अनुक्रमे 8.48 कोटी, 25.04 कोटी आणि 21.66 कोटी रुपये इतका होता.

Advertisement

स्ट्रँड लाईफ सायन्सेस कंपनीतली सुमारे सव्वा दोन कोटींचे समभाग रिलायन्स बिग व्हेंचर्स घेणार आहे. मार्चपर्यंत या कंपनीत 160 कोटी रुपयांची गुंतवणूक रिलायन्स बिग व्हेंचर्स करणार आहे. सध्या हा व्यवहार अंतिम टप्प्यात असून, आगामी काळात स्ट्रँड लाईफ सायन्सेस कंपनीची 80.30 टक्के हिस्सेदारी रिलायन्स बिग व्हेंचर्सकडे असेल.

Advertisement

भांडवली बाजारातही ‘रिलायन्स’ची घोडदौड सुरु आहे. रिलायन्स समभाग 2400 रुपयांच्या पातळीवर पोहोचला आहे. काल (शुक्रवारी) या समभागाने 4.10 टक्क्यांची उसळी घेतली. आगामी काळात या समभागाचा भाव आणखी वधारण्याची शक्यता आहे. सध्या रिलायन्सचे एकूण भांडवली मूल्य 15.40 लाख कोटींच्या घरात गेले आहे.

Advertisement

व्यापारी मार्गावरही अदानीचा ताबा
दरम्यान, मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळापाठोपाठ आता राज्यातील व्यापारी मार्गही अदानी समूहाच्या ताब्यात गेले आहेत. महाराष्ट्राच्या सहा राज्यांशी लागून असलेल्या सीमेवरील तपासणी नाक्यांच्या प्रकल्पांचा कारभार अदानी समूह पाहणार आहे.

Advertisement

मुंबई विमानतळाचा कारभार काही दिवसांपूर्वीच अदानी समूहाने हातात घेतला होता. मुंबई विमानतळ व्यवस्थापनामध्ये अदानी समूहाचा 74 टक्के हिस्सा असेल. जीव्हीके समूहाकडे असलेला 50.5 टक्के हिस्सा या समूहाने यापूर्वीच मिळविला आहे. आणखी 23.5 टक्के हिस्सा हा एअरपोर्ट कंपनी साऊथ आफ्रिका (एसीएसए) आणि बिडवेस्ट समूह या अन्य अल्पसंख्य भागीदारांकडून खरेदी केला जाईल, अशी माहिती अदानी समूहाकडून देण्यात आली होती.

Advertisement

मोदी सरकारची भन्नाट योजना, सात रूपये गुंतवून मिळणार पाच हजार रूपये महिना, वाचा काय आहेत अटी..
सप्टेंबरच्या या तारखेपासून हे अँड्रॉईड फोन होतील निरूपयोगी, जाणून घ्या फोन निरूपयोगी होण्यापासून वाचवण्याचा पर्याय

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply