Take a fresh look at your lifestyle.

कंगाल पाकिस्तान..! इम्रान सरकारने लोकांना केलेय ‘हे’ आवाहन; पहा, का आलीय अशी वेळ

नागरिकांना टॅक्स दिला तर देशाचा विकासासाठी निधी मिळेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली : भारताचा कुरापतखोर शेजारी पाकिस्तान सध्या स्वतःच्याच जाळ्यात पुरता अडकला आहे. दहशतवादास खतपाणी घालून अन्य देशांना त्रास देण्याच्या प्रयत्नात हा देश आता पुरता कंगाल झाला आहे. देशाची अर्थव्यवस्था पुरती डबघाईस आली आहे. त्यामुळे देशाचे राज्यकर्ते कर्ज घेऊन या संकटातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत आहेत. पण, हा प्रयत्नही सफल होताना दिसत नाही. कारण, पहिले कर्ज देण्यासाठी पुन्हा नवे कर्ज घ्यावे लागत आहे. त्यामुळे पाकिस्तान सरकारवर दिवसेंदिवस दबाव वाढत चालला आहे. राज्यकर्त्यांनी आता नागरिकांनाच टॅक्स भरण्याचे आवाहन केले आहे. नागरिकांना टॅक्स दिला तर देशाचा विकासासाठी निधी मिळेल, असे पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी म्हटले आहे.

Advertisement

देशात टॅक्स देणाऱ्या नागरिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे सरकारला अपेक्षित उत्पन्न मिळत नाही. लोकांनी टॅक्स देणे आवश्यक असले तरी तसे मात्र घडत नाही. लोकांच्या या बेजबाबदारपणावर इम्रान खान यांनी नाराजी व्यक्त केली. टॅक्स न भरणारे लोक एकही चांगले काम करत नाहीत. देशातील लोकांनी टॅक्स भरायला हवा तरच देशाचा विकास होणे शक्य आहे, असे त्यांनी सांगितले.

Advertisement

पाकिस्तानमध्ये महागाई वाढली आहे. धान्याचे संकट आहे. काही प्रांतात पिण्याचे पाणी सुद्धा मिळत नाही. मध्यंतरी इम्रान सरकारने घरगुती विज दरही वाढ केले होते. उत्पन्न मिळवण्याच्या दृष्टीने असेच काही निर्णय सरकारने घेतले होते. मात्र, त्याचा फायदा झाल्याचे दिसत नाही. संकटे कमी झालेली नाहीत. दुसरे देशांकडून कर्ज घ्यावे लागत असले तरी हे कर्ज परत करावे लागणार आहे. त्यामुळे कर्ज मिळवण्यासाठी  नेते मंडळी विदेशात दौरे करत असतात. विरोधी पक्षांनी सरकारच्या या कारभारावर जोरदार टीका केली आहे. मात्र, देशातील परिस्थितीत फारसा फरक पडलेला नाही. पैसा नाही म्हटल्यावर सरकारी योजना आणि अन्य महत्वाच्या कामकाजात अडचणी वाढल्या आहेत. या अडचणी कमी करुन अर्थव्यवस्था पूर्वपदावर आणणे आवश्यक आहे. यासाठी आता पाकिस्तान सरकारने लोकांना टॅक्स भरण्याचे आवाहन केले आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply