Take a fresh look at your lifestyle.

सप्टेंबरच्या या तारखेपासून हे अँड्रॉईड फोन होतील निरूपयोगी, जाणून घ्या फोन निरूपयोगी होण्यापासून वाचवण्याचा पर्याय…

येत्या 27 सप्टेंबरपासून  ज्या वापरकर्त्यांनी त्यांचा फोन अँड्रॉइड v2.3.7 आणि त्यापेक्षा कमी ओएस  (Operating system ) या आवृत्तीचा असेल. त्या फोनवर गुगल अॅप साईन इन करण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा तेथे Username किंवा Password Error असा मेसेज येईल.

मुंबई : सप्टेंबरचा महिना अँड्रॉईड फोन वापरकर्त्यांसाठी डोकेदुखीचा ठरणार आहे. कारण काही अँड्रॉईड स्मार्टफोन या महिन्यांच्या शेवटी पूर्णपणे निरुपयोगी होतील. या स्मार्टफोनमधील अनेक अॅप्स फोनला सपोर्ट करणे बंद होतील. त्यामुळे तुमचा फोन बॉक्समध्ये बदलेल. अशा स्थितीत अँड्रॉइड वापरकर्त्यांना त्यांचा फोन अपडेट करण्याशिवाय किंवा नवीन फोन खरेदी करण्याशिवाय पर्याय उरणार नाही. तर ती तारीख अगदीच जवळ आली आहे. त्यामुळे अँड्रॉइड वारकर्त्यांनी जाणून घ्यायला हवं.

Advertisement

 

Advertisement

9 टू 5 गुगलने आपल्या अहवालात वापरकर्त्यांना पाठवलेला स्क्रीनशॉट शेअर केला आहे. ज्यामध्ये या नव्या बदलामुळे प्रभावीत होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.  त्यामुळे अँड्रॉइडचे खूप जुन्या व्हर्जनचे फोन वापरणाऱ्या वापरकर्त्यांची संख्या खूपच कमी असण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा डेटा संरक्षित करण्यासाठी आणि खात्याची सुरक्षा वाढवण्यासाठी गुगलने (Google) हे पाऊल उचलले आहे.

Advertisement

 

Advertisement

येत्या 27 सप्टेंबरपासून  ज्या वापरकर्त्यांनी त्यांचा फोन अँड्रॉइड v2.3.7 आणि त्यापेक्षा कमी ओएस  (Operating system ) या आवृत्तीचा असेल. त्या फोनवर गुगल अॅप साईन इन करण्याचा प्रयत्न केला जाईल. तेव्हा तेथे Username किंवा Password Error असा मेसेज येईल. त्यामुळे जुन्या सॉफ्टवेअरचे अपडेट करणे किंवा फोन बदलणे गरजेचे आहे. कारण गुगलने पाठवलेला ईमेल काही वापरकर्त्यांसाठी महत्वाची सूचना आहे.

Advertisement

 

Advertisement

27 सप्टेंबरनंतर जुन्या अँड्रॉईड व्हर्जनचे वापरकर्ते जीमेल (Gmail), युट्यूब (Youtube), किंवा गुगल मॅप्स सारख्या सेवा साईन इन करण्याचा प्रयत्न करेल तेव्हा त्यांच्या स्क्रीनवर Error दिसेल, असे अहवालात म्हटले आहे. त्यामुळे नवीन खाते तयार करताना किंवा डाटा रिसेट केला  आणि पुन्हा साइन इन करण्याचा प्रयत्न केला तर त्यांना अजूनही एक त्रुटी दिसेल. जर त्यांनी त्यांचे Google खाते पासवर्ड बदलून पुन्हा साइन इन करण्याचा प्रयत्न केला. तरीही त्यांना एक त्रुटी दिसेल. या व्यतिरिक्त, आपण डिव्हाइसवरून खाते हटवण्याचा आणि पुन्हा जोडण्याचा प्रयत्न केला तरीही तीच त्रुटी दिसेल, असे म्हटले आहे.

Advertisement

 

Advertisement

त्यामुळे या अहवालानुसार गूगल यापुढे अँड्रॉइड v2.3.7 किंवा त्यापेक्षा कमी व्हर्जनवर चालणाऱ्या अँड्रॉइड फोनवर साइन-इनला सपोर्ट करणार नाही. Google ने वापरकर्त्यांना पाठवलेला ईमेल दर्शवितो की, हा बदल 27 सप्टेंबर 2021 पासून सुरू होईल. ईमेल वापरकर्त्यांना सप्टेंबरनंतर Google अॅप्स वापरणे सुरू ठेवण्यासाठी किमान Android 3.0 हनीकॉम्ब अपडेट करण्याचा सल्ला गुगलने दिला आहे. हे सिस्टम आणि अॅप लेव्हल साइन-इनवर परिणाम करेल, परंतु वापरकर्त्यांना फोनच्या ब्राउझरद्वारे जीमेल, गुगल सर्च, गुगल ड्राइव्ह, यूट्यूब आणि इतर गुगल सेवांमध्ये साइन इन करण्याची क्षमता या अॅपमुळे मिळू शकते.

Advertisement

 

Advertisement

मात्र  Android v2.3.7 आणि खालच्या आवृत्त्या वापरणाऱ्यांसाठी यापुढे  कोणताही पर्याय शिल्लक राहणार नाही. त्यामुळे त्यांनी गुगल अॅप्स आणि सेवांचा वापर सुरू ठेवण्यासाठी पर्यायी मार्ग शोधणे गरजेचे आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply