Take a fresh look at your lifestyle.

मेहुणा मेहुणीच्या नात्याला काळीमा, अपहरण करून केले हे कृत्य…

सतत वाढत जाणारे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडत आहे. 

नागपुर : मेहुणी आणि दाजीचे नाते खूपच चोखंदळ असते. तर बऱ्याचवेळा दाजी आणि मेहुणीच्या नात्यात प्रेमसंबंध जुळून आल्याच्या अनेक घटना वाचल्या किंवा पाहिल्या असतील. पण या वेगळ्या उंचीवरील मेहुणा- मेहुणीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना नागपुर शहरात घडली.

Advertisement

 

Advertisement

नागपुर शहरातील गोधनी परिसरात राहणारी पीडित मुलगी जेव्हा शिकवणी संपवून आपल्या घरी परतत होती. तेव्हा तिचा मेहूणा असलेल्या मंगेशने तिला थांबवले आणि प्लर्टिंग सुरू केले. त्यानंतर त्यानेे पीडितेला त्याचा व्हिडीओ दाखवला. त्यावेळी मंगेशचे दोन मित्र तेथे आले आणि मंगेश आणि त्याच्या दोन मित्रांनी पीडितेचे अपहरण केले. त्यानंतर त्यांनी त्या मुलीला निर्जन ठिकाणी नेले. तेथे पीडितेला दारू पाजली आणि त्यानंतर त्यांनी तिच्यावर सामुहिक बलात्कार केला.

Advertisement

 

Advertisement

मंगेश आणि त्याच्या मित्रांनी पीडितेवर बलात्कार केल्यानंतर पीडितेला ओलीस ठेवले आणि तिच्याकडून तीन लाख रूपयांची मागणी केली. मात्र पीडितेने पैसे देण्यास नकार दिला. तेव्हा तीघांनी तिच्या शरीरावर सिगारेटचे चटके देत मानुसकीला काळीमा फासणारं कृत्य केले. मात्र त्यानंतर पीडिता तीघा हैवानांच्या तावडीतून पळून जाण्यात यशस्वी ठरली. तर पुढे सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आरोपींच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यानंतर मानकापूर पोलिसांनी तीनही आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Advertisement

 

Advertisement

नागपूरच्या मानकापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडितेचे काही अश्लील व्हिडीओ आरोपींसोबत होते. ज्याद्वारे आरोपी पीडितेला ब्लॅकमेल करत होता. या ब्लॅकमेलिंगच्या माध्यमातून आरोपीने दोन वेळा 24 आणि 25 हजार रूपये घेतले. मात्र यावेळी सामुहिक बलात्कारानंतर आरोपीने पीडितेकडे तब्बल तीन लाख रूपयांची मागणी केली. तर पैसे न दिल्यास व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी दिली होती.

Advertisement

 

Advertisement

मात्र सतत वाढत जाणारे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पोलिसांची भीती राहिली नाही का असा प्रश्न सामान्य नागरीकांना पडत आहे.  राज्याची उपराजधानी असलेले नागपूर शहर गुन्हेगारी राजधानी बनताना दिसत आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply