Take a fresh look at your lifestyle.

या प्रकरणात तपास यंत्रणेनेच केली न्यायालयाच्या डोळ्यात धुळफेक, न्यायालयाने पोलिसांना झापले…

मुंबई पोलिसांशी तुलना होत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या कार्यशैलीवर न्यायालयाने केलेली टिका दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश आस्थाना यांच्यासाठी लज्जास्पद आहे.

दिल्ली : देशात कोणत्याही ठिकाणी गुन्हा घडल्यानंतर पोलिस त्याचा तपास करतात. न्यायालयात खटला दाखल होतो. वर्षानुवर्षे खटला चालतो. मात्र गुन्हेगार कोण हे शोधण्यात पोलिसांना अनेकदा अपयश येते. अशीच एक घटना राजधानी दिल्लीत घडली होती. ज्यावर न्यायालयाने पोलिसांवर गंभीर टीका केली.

Advertisement

 

Advertisement

दिल्ली झालेल्या दंगलींबाबत दिल्ली पोलिसांच्या कार्यप्रणालीवर विशेष न्यायालयाने प्रश्न उपस्थित केले आहेत. तर दिल्ली पोलिसांची प्रतिमा कोणापासूनही लपून राहिलेली नाही. अशा परिस्थितीत जर न्यायालयही पोलिसांवर गंभीर टीका करत असेल, तर हा प्रश्न लोकशाहीच्या पहारेकऱ्याला टोचल्याशिवाय राहणार नाही.

Advertisement

 

Advertisement

मुंबई पोलिसांशी तुलना होत असलेल्या दिल्ली पोलिसांच्या कार्यशैलीवर न्यायालयाने केलेली टिका दिल्लीचे पोलिस आयुक्त राकेश आस्थाना यांच्यासाठी लज्जास्पद आहे. विशेष न्यायालयाने सर्वोच्च न्यायालयाचा हवाला देत ईशान्य दिल्लीतील दंगलीतील एफआयआर नोंदणीवर आश्चर्य व्यक्त केले आहे.

Advertisement

 

Advertisement

दिल्ली दंगलीबाबत स्थापन करण्यात आलेल्या विशेष न्यायालयाचे अतिरिक्त सत्र न्यायाधीश विनोद यादव यांनी महत्वपुर्ण टिप्पणी केली आहे. त्यांनी असे म्हटले आहे की, फाळणीनंतर दिल्लीतील ही सर्वात वाईट जातीय दंगल आहे. तसेच इतिहासात मागे वळून पाहताना, जेव्हा  नवीन वैज्ञानिक तंत्रज्ञानाचा आधार घेतला असतानाही तपास यंत्रणेला आलेलं अपयश नक्कीच लोकशाहीसाठी दुःख देणारं असेल.

Advertisement

 

Advertisement

तसेच न्यायाधीश यादव म्हणाले की, पोलिसांनी इतका वेळ तपासासाठी घेतल्यानंतरही दंगल प्रकरणात केवळ पाच साक्षीदार मिळाले आहेत. त्यामध्ये एक पीडित, दुसरा कॉन्स्टेबल ज्ञान सिंह, एक अधिकारी, एक औपचारिक साक्षीदार आणि एक आयओ (IO) एवढेच साक्षीदार मिळाले आहेत. त्यामुळे दंगल प्रकरणात करदात्यांनीन कष्टाने कमावलेल्या पैशांचा मोठा अपव्यय झाला आहे, अशी टिप्पणी पोलिस तपासावर करत न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. त्यामुळे चौकशीच्या हेतूवरच प्रश्न उपस्थित झाला आहे.

Advertisement

 

Advertisement

न्यायालयाने निरीक्षण नोंदवतांना म्हटले आहे की, ज्याप्रकारे पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी केली त्यामध्ये वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या देखरेखीचा अभाव स्पष्ट होत आहे.  तर या प्रकरणात तपास यंत्रणेने केवळ न्यायालयाच्या डोळ्यात धुळफेक केली आहे, असे मत व्यक्त केले.

Advertisement

 

Advertisement

न्यायालयाने दिल्ली दंगलीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केला आहे. न्यायालयाने म्हटले आहे की, तोडफोड, लूटमार आणि जाळपोळ करताना दंगलखोरांची एवढी मोठी गर्दी कोणी पाहिली नाही, हे समजण्याजोगे नाही. तक्रारीची अत्यंत संवेदनशीलतेने आणि कार्यक्षमतेने चौकशी करायला हवी होती. परंतु या तपासात ती केली नाही. न्यायालयाने पोलिसांनी फटकारत म्हटले की, प्रत्यक्षदर्शी, आरोपी आणि तांत्रिक पुरावे शोधण्याचा तुम्ही कोणताही प्रयत्न केला नाही.  तर हे प्रकरण पोलिसांनी केवळ आरोपपत्र दाखल करून सोडून  दिले असा ठपकाही न्यायालयाने ठेवला.

Advertisement

 

Advertisement

गेल्या दीड वर्षापासून अनेक आरोपींच्या खटल्यांची सुणावणी होत नसल्याने आरोपींना तुरूंगात रहावे लागत आहे. तसेच पोलिस अद्यापही आरोपपत्र दाखल करण्यात व्यस्त आहेत. त्यामुळे खटल्यांच्या तारखांंमागून तारखा देऊन पोलिस न्यायालयाचा अमूल्य वेळ वाया घालवत आहेत, अशी टिकाही न्यायालयाने केली.

Advertisement
Advertisement

Leave a Reply