Take a fresh look at your lifestyle.

भारताने पाकची नापाक चाल केली फेल, इम्रान सरकारचा थयथयाट.. जाणून घ्या पाकिस्तानची चाल…

गिलानी यांच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा हिंसा भडकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इम्रान सरकारला अपयश आल्याने पाकिस्तानने थयथयाट केला

दिल्ली : पाकिस्तान भारताविरोधात कारवाया करण्याची एकही संधी सोडत नाही. काश्मीर खोऱ्यात युवकांना भडकवून भारताविरोधात दहशतवादी कारवाया करण्यास भाग पाडण्यासारखे अनेक प्रयत्न केले जातात. मात्र भारत काही पाकिस्तानची डाळ शिजू देत नाही. भारताने स्वातंत्र्यापासून आतापर्यंत पाकिस्तानला धुळच चारली आहे.  तर आता भारताने काश्मीर खोऱ्यात हिंसा भडकवण्याच्या पाकिस्तानी मनसुब्यांना सुरूंग लावला आहे.

Advertisement

 

Advertisement

जम्मू-काश्मीर राज्यातील पाकिस्तान समर्थक फुटीरतावादी नेते सय्यद अली शाह गिलानी यांचे वयाच्या 91 व्या वर्षी दीर्घ आजाराने श्रीनगरच्या बाहेरील हैदरपुरा येथील निवासस्थानी बुधवारी रात्री निधन झाले. यावेळी गिलानी यांचा मुलगा नईमने गिलानी यांचे शव श्रीनगरमधील शहिदांचे कब्रस्तान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या स्मशानभुमीत दफन करायचे आहे असे म्हटले. कारण अनेक फुटीरतावादी नेत्याचा दफनविधी या स्मशानभुमीत करण्यात आला होता. पण प्रशनासनाने त्यांना तसे करू दिले नाही. तर गुरूवारी मध्यरात्री कडक बंदोबस्तात गिलानी यांच्या घराजवळच्या मशिदीत पुरण्यात आले.

Advertisement

 

Advertisement

गिलानी यांच्या मृत्यूनंतर जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा हिंसा भडकवण्याचे स्वप्न पाहणाऱ्या इम्रान सरकारला अपयश आल्याने पाकिस्तानने थयथयाट केला. कारण गिलानींचा मृतदेह पाकिस्तानला संपुर्ण जमावासह दफन करायचा होता. तसेच तेथे जमलेल्या लोकांना भारताविरोधात भडकवून हिंसाचार माजवण्याचा नापाक प्रयत्न होता. मात्र भारताने पाकिस्तानची नापाक चाल फेल करत गिलानी यांच्या शेवटच्या भेटीसाठी फक्त कुटूंब आणि जवळच्या नातेवाईकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिली.

Advertisement

 

Advertisement

भारताने खबरदारीचा उपाय म्हणून गिलानीच्या कुटूंबाला शव रात्रीच त्यांच्या ताब्यात देण्यास सांगण्यात आले. कारण गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार काही राष्ट्रविरोधी घटक काश्मीर खोऱ्यातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याची शक्यता होती. त्यामुळे गिलानींचे शव रात्रीच दफन केल्याने पाकिस्तानच्या इम्रान सरकारचा जळफळाट झाला. तर पाकिस्तानचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार मोईद युसूफने भारताला इशाराही दिला.

Advertisement

 

Advertisement

पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने याला रानटी कृत्य म्हटले असून पाकिस्तानी परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते असीम इफ्तिखार यांनी म्हटले की, भारतीय सुरक्षा दलाने गिलानी यांचा मृतदेह हिसकावला. तसेच असीमने पुढे म्हटले की, गिलानी यांना त्यांच्या मनाप्रमाणे शहीदांच्या स्मशानभुमीत दफन केले नाही. तर त्यांच्या कुटूंबियांना त्रास दिला.

Advertisement

 

Advertisement

पाकिस्तानी प्रवक्त्याने म्हटले आहे की, भारत सरकार गिलानींना घाबरत आहे. त्यामुळे गिलानी यांचे पार्थिव दफन केल्यानंतर इंटरनेट बंद करून कर्फ्यू लावला आहे. त्यासाठी त्यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाच्या हस्तक्षेपाची मागणी केली आहे.

Advertisement
Advertisement

Leave a Reply