Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारची भन्नाट योजना, सात रूपये गुंतवून मिळणार पाच हजार रूपये महिना, वाचा काय आहेत अटी..

या योजनेमध्ये बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेले 18 ते 40  वर्ष वय असलेले कोणतेही नागरीक सहभागी होऊ शकतात.

दिल्ली : केंद्र सरकारने सामान्य लोकांसाठी अनेक कल्याणकारी योजना आणल्या आहेत. त्यापैकी कामगारांसाठी आणलेली अटल पेन्शन योजना लोकांना खूप आवडली. पीएफआरडीएच्या मते, अटल पेन्शन योजनेच्या लाभार्थ्यांच्या संख्येने 25 ऑगस्टपर्यंत 3 कोटी 30 लाखांचा टप्पा पार केला आहे. या योजनेंतर्गत  60 वर्ष वयानंतर नागरीकांना पेन्शनच्या रूपात 1000, 2000, 3000, 4000 आणि 5000 रूपये मिळणार आहेत. तर या योजनेमध्ये बँक किंवा पोस्ट ऑफिसमध्ये खाते असलेले 18 ते 40  वर्ष वय असलेले कोणतेही नागरीक सहभागी होऊ शकतात.

Advertisement

 

Advertisement

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ही योजना 9 मे 2015 रोजी सुरू केली होती. तर या योजनेंतर्गत चालु वर्षात 28 लाखांहून अधिक APY खाती उघडण्यात आले आहेत. PFRDA कडे उपलब्ध आकडेवारीनुसार 78 टक्के लोकांनी 1000 रूपये प्रति महिना योजनेची निवड केली आहे. तर 14 टक्के लोकांनी 5000 रूपये प्रति महिना पेन्शन योजनेची निवड केली आहे.

Advertisement

 

Advertisement

अटल पेन्शन योजनेचा जास्त लाभ मिळवण्यासाठी लहान वयातच या योजनेत सामिल व्हायला हवे. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सहभागी झालात, तर तुम्हाला या योजनेत दररोज फक्त 7 रुपये जमा करून दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते. तर या योजनेसाठी दर महिन्याला तुम्हाला 210 रुपये जमा करावे लागतील. तर दर महिन्याला 1000 रुपयांच्या पेन्शनसाठी दरमहा फक्त 42 रुपये जमा करावे लागतील. यामध्ये 2,000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3,000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4,000 रुपये मासिक पेन्शनसाठी दर महिन्याला 168 रुपये जमा करावे लागतील, तर या योजनेचा लाभ मिळू शकतो.

Advertisement

 

Advertisement

या योजनेत गुंतवणूक कशी करावी?

Advertisement
  • अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html वेबसाईटला भेट द्या.
  • त्यानंतर तुमच्या आधार कार्डवर असणारा तपशील तेथे भरा आणि सबमिट करा.
  • तुम्ही ही माहिती भरताच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल.
  • तो ओटीपी तुम्ही प्रविष्ट करताच त्याची पडताळणी केली जाईल.
  • पडताळणी पुर्ण  होताच तिथे तुमच्या बँकेची माहिती द्या, ज्यात तुमचा खाते क्रमांक आणि पत्ता टाईप करा. हे केल्यानंतर तुमचे खाते सक्रीय होईल.
  • त्यानंतर तुम्ही नॉमिनी आणि प्रीमियम पेमेंटबद्दल माहिती भरणे गरजेचे आहे. ही माहिती पुर्ण भरल्यानंतर तुम्ही पडताळणीसाठी फॉर्मवर ई-सही करा. ही प्रक्रीया पुर्ण केल्यानंतर अटल पेन्शन योजनेसाठी तुमची नोंदणी पूर्ण होईल.
 APY ग्राहक 60 वर्ष वय पुर्ण होण्यापुर्वी मृत्यूमुखी पडला तर त्याच्या जोडीदाराला हे खाते सुरू ठेवण्याचा अधिकार आहे. तर या योजनेसंदर्भात अधिक माहिती जर तुम्हाला या योजनेसंदर्भात अधिक माहिती हवी असेल तर तुम्ही 1800-110-069 या क्रमांकावर कॉल करू शकता. तसेच जर एखाद्या ग्राहकाला 60 वर्षांपूर्वी या योजनेतून बाहेर पडायचे असेल तर तो  ग्राहक स्वेच्छेने या योजनेतून बाहेर पडू शकतो. या प्रकरणात त्याला व्याजासह पुर्ण रक्कम मिळेल.
Advertisement

Leave a Reply