Take a fresh look at your lifestyle.

टोमॅटोचे भाव का कोसळले..? कशामुळे आली शेतकऱ्यांवर डोक्याला हात लावण्याची वेळ, वाचा..!

पुणे : यंदा टोमॅटोने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले. बाजारात मोठ्या प्रमाणात आवक वाढल्याने टोमॅटोला मातीमोल भाव मिळत आहेत. त्यामुळे सरकारवर राग व्यक्त करुन शेतकरी रस्त्यावरच टोमॅटो फेकून देऊन रिकाम्या हाताने घरी जात आहे.

Advertisement

‘पुरवठा अधिक, तर किंमत कमी..’ हा कोणत्याही बाजाराचा साधा नियम आहे. अतिपिक झाल्याने टोमॅटोचे भाव गडगडल्याचे स्पष्ट आहे. देशभरातील ३१ पैकी २३ केंद्रांवर टोमॅटोच्या दरांत गेल्या वर्षीच्या तुलनेत निम्म्याने घसरण नोंदविण्यात आली. पण टोमॅटो उत्पादकांवर यंदाच अशी वेळ का आली, याबाबतचा घेतलेला आढावा…

Advertisement

मध्य प्रदेशमधील देवास हे ठिकाण देशातील सर्वात मोठे टोमॅटो खरेदी-विक्रीचे आगार मानले जाते. गेल्या वर्षी येथे ११ रुपये प्रतिकिलो या दराने टोमॅटो विकला होता. यंदा हाच दर ८ रुपये प्रति किलो झाला आहे. जळगावात गेल्या वर्षी याच काळात २१ रुपये प्रति किलोने टोमॅटो विकले गेले. यंदा फक्त ४ रुपये किलो असा मातीमोल भाव टोमॅटोला मिळाला आहे. त्यातून शेतकऱ्याचा उत्पादनखर्चही निघत नाही.

Advertisement

प्रमख शहरातील टोमॅटोच्या दरातील फरक (प्रति किलो)

Advertisement
  • औरंगाबाद : ९.५० (२०२०), तर ४.५० (२०२१)
  • कोल्हापूर : २५ (२०२०), तर ६.५० (२०२१)
  • सोलापूर : १५ (२०२०), तर ५ (२०२१)

इतर राज्यांतील चित्र

Advertisement
  • कर्नाटक-  १८.७० (२०२०), तर ५.३० (२०२१)
  • आंध्र प्रदेश-  ४० (२०२०), १८ (२०२१)
  • उत्तर प्रदेश – २८ (२०२०), ८ (२०२१)
  • प. बंगाल – ३४ (२०२०), २५ (२०२१)
  • दिल्ली – ३६ (२०२०), २४ (२०२१)

काय करता येईल?
देशातील अन्नप्रक्रिया क्षेत्रातील कंपन्यांनी पुढे येऊन टोमॅटोची रास्त भावात खरेदी केल्यास काही प्रमाणात शेतकऱ्यांना दिलासा मिळू शकेल. त्यादृष्टीने मोदी सरकारचे प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.

Advertisement

मोदी सरकारचा पुन्हा एकदा दणका..! गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ, सामान्यांचे बजेट कोलमडले..!
अरे बापरे ! Jio बंपर ऑफर, नवीन जिओ फोन मिळणार पूर्णपणे मोफत; वाचा काय आहेत अटी

Advertisement
Advertisement

Leave a Reply