Take a fresh look at your lifestyle.

खासदार विखेंच्या ‘त्या’ वक्तव्याची राज्यात चर्चा; वाचा काय म्हणाले सुजय विखे..

केंद्र सरकारच्या योजना सांगताना सुजय विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं, तर राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली.

अहमदनगर : देशात राजकारण वेगाने फिरत आहे. अनेक राज्यातील विरोधकांची सरकारं पाडून भाजपाने सत्तेचा सोपान पार पाडला. राज्यात भाजपाचे सर्वात जास्त 106 आमदार आहेत. तरीही भाजपा विरोधी पक्षात आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसने महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात उध्दव ठाकरेंच्या नेतृत्वात सरकार स्थापन केले. मात्र भाजपाकडून सातत्यात फसवणूकीने सरकार स्थापन केले जात असल्याचे म्हटले जात आहे.

Advertisement

ठाकरे सरकार स्थापन झाल्यापासून सातत्याने सरकार कोसळण्याविषयी भाजप नेत्यांकडून दावा केला जात आहे. यामध्ये आणखी एका भाजपा खासदाराची भर पडली आहे. भाजप खासदार सुजय विखे (BJP MP Dr. Sujay Vikhe ) यांनी दिवाळीनंतर राज्यात भाजपचं सरकार येणार असल्याचा दावा केला आहे. खासदार सुजय विखे केंद्र सरकारच्या योजनांचा आढावा घेण्यासाठी कर्जत तालुक्यात आले होते. तेव्हा डॉ. सुजय विखे यांच्यासमोर राज्य सरकारच्या विविध योजनांसंबधीच्या तक्रारी करण्यात आल्या. तेव्हा सुजय विखे म्हणाले, थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपलेच सरकार येणार आहे.

Advertisement

भाजपा खासदार सुजय विखे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांच्या मतदारसंघात सरकार पडण्याविषयी विधान केल्याने त्याची राज्यभर चर्चा सुरू झाली. गेल्या अनेक दिवसात भाजपा कार्यकर्त्यांनी आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. भाजपाचा बालेकिल्ला असलेल्या जामखेड-कर्जत मतदारसंघाला खिंडार पाडत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी विजय मिळवला. लवकरच कर्जत आणि जामखेड नगरपालिकांच्या निवडणूकीचा बिगूल वाजणार आहे. त्यामुळे या पार्श्वभुमीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.

Advertisement
मंगळवारी खासदार विखे आणि माजी मंत्री प्रा. राम शिंदे यांनी कर्जत तालुक्यात आढावा बैठका घेतल्या. यावेळी केंद्र सरकारच्या विविध योजनांचा आणि सरकारी लसीकरण केंद्राचाही आढावा घेतला. यावेळी खासदार विखे यांनी लसीकरणाला अधिक गती देण्याच्या सूचना दिल्या. कर्जत पंचायत समितीच्या आढावा बैठकीत नागरीकांनी सुजय विखे यांना अनेक प्रश्न व समस्या सुटत नसल्याबद्दल तक्रारी केल्या. त्यांना उत्तर देतांना विखे म्हणाले की, थोडं थांबा, दिवाळीनंतर राज्यात आपल्या विचारांचे सरकार येणार आहे. त्यामुळे तुमचा कोणताही प्रश्न शिल्लक राहणार नाही.
यावेळी केंद्र सरकारच्या योजना सांगताना सुजय विखे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं भरभरून कौतुक केलं, तर राज्य सरकारच्या धोरणांवर टीका केली. केंद्र सरकारने देशातील शेतकऱ्यांना पीएम किसान (PM Kisan Yojana) योजनेअंतर्गत ७२ हजार कोटी रुपये दिले आहेत. तर दुसरीकडे राज्य सरकारने दोन लाख रुपयांची कर्जमाफी व नियमित पैसे भरणाऱ्यांना ५० हजार रुपयांची जाहीर केलेली विशेष सवलत कागदावरच राहिली.
डॉ. सुजय विखे पुढे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकरी, शेतमजूर, महिला, पुरुष, विद्यार्थी आणि युवक यांच्यासाठी देशात विविध योजना राबवल्या आहेत. जगभरात सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सर्व नागरिकांसाठी करोनाची प्रतिबंधक लस उपलब्ध करून दिली. तर जेथे लसीकरण कमी झालं आहे अशा ठिकाणी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. त्यामुळे १५ सप्टेंबरपर्यंत सर्व गावांमध्ये लसीकरणाचे प्रमाण सारखं झालेलं असेल, असं मत सुजय विखे यांनी व्यक्त केले.
Advertisement

Leave a Reply