Take a fresh look at your lifestyle.

…त्यामुळे अण्णा हजारेंनी व्यक्त केला संताप, म्हणाले त्यांच्यावर कारवाई करणार..

जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 10 दिवसात राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी अल्टीमेटम दिला. तेव्हापासून अण्णा हजारे राज्यभर चर्चेत आहेत. त्यानंतर अण्णा हजारे यांनी शिक्षकांवर वक्तव्य केल्याची खोटी बातमी छापून आली होती. त्याविरोधात अण्णांनी संताप व्यक्त केला. 

अहमदनगर : कायदेमंडळ, न्यायमंडळ, कार्यकारी मंडळ या लोकशाहीच्या तीन स्तंभाबरोबरच पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ मानला जातो. मात्र ब्रेकींग बातमीच्या नादात अनेक वेळा पुर्ण खात्रीनिशी बातमी दिली जात नाही. तसेच सध्या फेक न्यूज आणि पेड न्यूज यांचा सुळसुळाट झालेला आहे. त्यामुळे पत्रकारांनी व माध्यमांनी अत्यंत जबाबदारीने वागायला पाहिजे. परंतू या क्षेत्रात काही अपप्रवृत्ती घुसल्या आहेत. त्या खोट्या बातम्या देऊन प्रतिष्टीत व्यक्तींना बदनाम करत असतात.

Advertisement

 

Advertisement

कोरोनाची रूग्णसंख्या कमी होत असल्याच्या पार्श्वभुमीवर भाजपाने राज्यातील मंदिरे उघडण्याची मागणी करत आंदोलन केले. त्यानंतर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी 10 दिवसात राज्यातील मंदिरे उघडण्यासाठी अल्टीमेटम दिला. तेव्हापासून अण्णा हजारे राज्यभर चर्चेत आहेत. त्यानंतर अण्णा हजारे यांनी शिक्षकांवर वक्तव्य केल्याची खोटी बातमी छापून आली होती. त्याविरोधात अण्णांनी संताप व्यक्त केला.

Advertisement

 

Advertisement

अण्णा हजारे म्हणाले की, खोट्या बातम्या पसरवून अनेक वेळा भ्रम निर्माण केला जातो. अशा खोट्या बातम्या पसरवणाऱ्या प्रवृत्तींना समाजाने थारा देऊ नये. समाजातील वातावरण सौहार्दपूर्ण राहील याचा विचार करावा. शिक्षकी पेशा एक पवित्र पेशा असल्याने शिक्षकांनी खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवू नये. तसेच गैरसमज करून न घेता आपले ज्ञानदानाचे पवित्र काम सुरू ठेवायला हवे.

Advertisement

 

Advertisement

या प्रकरणावरून हजारे यांनी प्रेस नोट प्रसिद्धीसाठी दिली आहे. त्यामध्ये म्हटले की, ‘नाही तरी शिक्षक शाळेत जाऊन कोणता उजेड पाडतात : अण्णा हजारे’ या मथळ्याखाली प्रसिद्ध झालेली बातमी वाचण्यात आली. ती बातमी वाचून आश्चर्य वाटले. जे विधान मी केलेच नाही, ते विधान माझ्या तोंडी घालून समाजात द्वेष भावना निर्माण करण्यासाठी अशी खोटी बातमी प्रसिद्ध केली आहे असे वाटते. या वर्तमानपत्राची अधिकची चौकशी केली असता त्यातून असे निदर्शनास आले की, सदर बातमी फक्त एका दैनिकात प्रसिद्ध झाली आहे.  तर यापूर्वीही अनेकदा त्या वृत्तपत्रातून माझ्याबद्दल आणि जन आंदोलनाबद्दल चुकीच्या व खोट्या बातम्या, लेख प्रसिध्द करण्यात आले आहेत. अशाच प्रकारची एक खोटी बातमी छापल्याबद्द्ल आमचे वकिल श्याम असावा यांनी त्या वृत्तपत्राला २०१९ मध्ये कायदेशीरक कारवाई करण्यासंबंधी नोटीस बजावली होती. तेव्हा नोटीस मिळाल्यानंतर त्यांनी जाहीर दिलगिरी व्यक्त केली होती. म्हणून त्यानंतर आम्ही त्याकडे दुर्लक्ष केले व कारवाई करण्याचे टाळले. परंतू आता पुन्हा त्यांनी अशीच खोटी बातमी छापून शिक्षक, पालक व विद्यार्थी वर्गामध्ये गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबद्दल त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे.

Advertisement

 

Advertisement
पुढे बोलताना अण्णा म्हणाले की, मी नेहमी सांगत असतो. दिवसेंदिवस वाढती द्वेषभावना ही समाज व देशासाठी अत्यंत घातक आहे. काही अविचारी लोक समाजात दुही, द्वेषभावना आणि तेढ निर्माण होईल असा प्रयत्न  करीत असतात. त्यामुळे समाजाचे मोठे नुकसान होते.
Advertisement

Leave a Reply