Take a fresh look at your lifestyle.

मोदी सरकारचा पुन्हा एकदा दणका..! गॅसच्या किंमतीत २५ रुपयांची वाढ, सामान्यांचे बजेट कोलमडले..!

नवी दिल्ली : पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे आधीच जेरीस आलेल्या नागरिकांना महिन्याच्या पहिल्याच तारखेला झटका बसला आहे. विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलिंडरच्या किमतीत आज (बुधवारी) पुन्हा एकदा २५ रुपयांनी वाढविण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता दिल्लीत १४.२ किलो घरगुती सिलिंडरची किंमत ८८४.५० झाली आहे.

Advertisement

घरगुती गॅसची किरकोळ विक्रीची किंमत १ मार्च २०१४ रोजी ४१०.५ रुपये प्रति सिलिंडर होती. गेल्या सात वर्षांत घरगुती स्वयंपाकाच्या गॅसची किंमती दुप्पट झाल्या आहेत. १ जानेवारी २०२१ पासूनच आतापर्यंत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरच्या दरात १९० रुपयांची वाढ झालीय. सरकारने दरमहा दरवाढ करताना एलपीजी गॅसवर दिली जाणारी सबसिडी बंद केली. मासिक दरवाढीमुळे मे २०२० पर्यंत सबसिडी बंद करण्यात आल्याचे समजते.

Advertisement

दरम्यान, व्यावसायिक १९ किलोच्या सिलिंडरच्या किंमतीतही 75 रुपयांची वाढ करण्यात आली आहे. मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर आता ८८४.५ रुपये आहे, पूर्वी तो ८५९.५० रुपये होता. चेन्नईत स्वयंपाकाच्या गॅस सिलिंडरसाठी तुम्हाला आजपासून ९००.५० रुपये भरावे लागतील. कालपर्यंत ७५५.५० रुपये भरावे लागत होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलेंडरसाठी ८९७.५ रुपये मोजावे लागणार आहेत.

Advertisement

दरम्यान, मागील अनेक दिवसांपासून पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. त्यानंतर आज वाहनचालकांना काहीसा दिलासा देताना, पेट्रोल व डिझेलच्या दरात अनुक्रमे १३ व १५ पैशांची कपात करण्यात आली आहे. त्यामुळे आता दिल्लीत पेट्रोलची किंमत प्रति लिटर १०१.३४ रुपये, तर मुंबईत १०७.३९ रुपये प्रति लिटर झाली आहे. दिल्लीत डिझेलची किंमत ८८.७७ रुपये आणि मुंबईत ९६.३३ रुपये प्रति लिटर झाली आहे.

Advertisement

अरे बापरे ! Jio बंपर ऑफर, नवीन जिओ फोन मिळणार पूर्णपणे मोफत; वाचा काय आहेत अटी
मोदी सरकार एलआयसीमध्ये एफडीआयची मर्यादा निश्चित करणार, ग्राहकांवर काय परिणाम होणार, वाचा..

Advertisement
Advertisement

Leave a Reply