Take a fresh look at your lifestyle.

गोपाळकाला व दहीहंडी उत्सवानिमीत्त स्वयंभु युवा प्रतिष्ठानची रक्तदान चळवळ…

सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वयंभू युवा प्रतिष्ठाणच्या युवा सहकाऱ्यांनी रक्तदानाची मोठी चळवळ उभी केली आहे. त्यांचे हे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे.

अहमदनगर (प्रतिनिधी) : कोरोनाच्या संकटात अत्यंत कमी रक्तसाठा शिल्लक आहे.  त्यामुळे आरोग्य यंत्रणेला रक्ताची नितांत आवश्यकता आहे. शासन स्तरावरून रक्तदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. त्यामुळे सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून स्वयंभू युवा प्रतिष्ठाणच्या युवा सहकाऱ्यांनी रक्तदानाची मोठी चळवळ उभी केली आहे. त्यांचे हे काम समाजासाठी प्रेरणादायी आहे, असे मत श्रीगोंदा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शुभांगीताई पोटे यांनी व्यक्त केले आहे.
स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने गोपाळकाला आणि दहीहंडी उत्सवानिमित्त मंगळवारी (दि. ३१) रोजी श्रीगोंदा येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिराच्या उद्घाटनप्रसंगी नगराध्यक्षा शुभांगी पोटे बोलत होत्या. यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर, डॉ. विक्रम भोसले,  भारती इंगावले, प्रतिभा गांधी, अरविंद नाना कासार,  प्रसाद टकले आदी उपस्थित होते. तर स्वयंभू प्रतिष्ठाणचे जिल्हाप्रमुख ओंकार काळे हे या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
या रक्तदान शिबिरात तब्बल 83 रक्तपिशव्यांचे संकलन करण्यात आले असून स्वयंभू युवा प्रतिष्ठाणने सामाजिक जबाबदारी निभावल्यामुळे अनेक रुग्णांना जीवनदान  मिळणार आहे, अशी भावना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नितीन खामकर यांनी व्यक्त  केले. तसेच या अनोख्या उपक्रमातून रक्तदान चळवळ उभी करणाऱ्या स्वयंभू युवा प्रतिष्ठानच्या सहकाऱ्यांचे कौतुक केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी हिरामोती पान पार्लर,श्रीगोंदा , जनकल्याण रक्तपेढी,अहमदनगर  व स्वयंभू युवा प्रतिष्ठाण परिवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले.
Advertisement

Leave a Reply