Take a fresh look at your lifestyle.

दिल्लीच्या विद्यार्थ्याची भन्नाट शक्कल, वाचा असा शोधता येणार कोरोनाचा व्हायरस..

अनुप्रयोग कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने त्याचा अचूकता दर 90 टक्क्यांपर्यंत आहे. हा अनुप्रयोग तीन ते पाच सेकंदात कोविड ओळखू शकतो.

नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटाने संपुर्ण जग मेटाकुटीला आले आहे. कोरोनाने जणूकाही लोकांना वेठीस धरले आहे. संपुर्ण उद्योग धंद्याची वाट लागली आहे.  कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रत्येक देशाचे सरकार ना ना तऱ्हेचे प्रयत्न करत आहे. मात्र अजूनही कोरोनावर पुर्णपणे नियंत्रण मिळवणे शक्य झाले नाही. परंतू कोरोनावर उपाययोजना करण्यासाठी जगभरातील शास्रज्ञ दिवसरात्र प्रयोगशाळेत संशोधन करत आहेत. मात्र कोरोनावर ठोस उपाय मिळाला नाही.
कोरोनावर नियंत्रण मिळवण्यातील प्रमुख अडचण  म्हणजे कोरोना रूग्णाचा शोध घेणे. यासाठी दक्षिण दिल्ली येथील एका आर्यन गुलाटी या विद्यार्थ्याने कोरोनाचा संसर्ग शोधणारे अॅप विकसीत करून नवी ओळख निर्माण केली आहे. आर्यनने आपला वेब-आधारित संशोधन LangAI 2020 मध्ये सेल्फ-रिलायंट इंडिया आयडियाथन स्पर्धेत सादर केला होता. त्याच्या मॉडेलची निवड मनुष्यबळ विकास मंत्रालयाने देखील केली होती. तसेच त्याच्या अनुप्रयोगाला शाश्वत पर्यावरणाच्या श्रेणीमध्ये प्रमुख स्थान मिळाले. आर्यन दिल्ली पब्लिक स्कूल, आर के पुरमचा विद्यार्थी आहे.
त्याने विकसीत केलेले अॅप पुढील चाचणीसाठी वैध ठरवले आहे. सध्या ते भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेशी चर्चा करत आहेत. तर अनुप्रयोग कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असल्याने त्याचा अचूकता दर 90 टक्क्यांपर्यंत आहे. हा अनुप्रयोग तीन ते पाच सेकंदात कोविड ओळखू शकतो, असा दावा करण्यात आला आहे.
हे अॅप फुफ्फुसाच्या कर्करोगासह 16 प्रकारचे फ्फुसांचे रोग ओळखू शकते. तसेच आर्यन म्हणाला की, जेव्हा एखादा व्यक्तीला कोरोनाचा संसर्ग होतो, तेव्हा आपल्या फुफ्फुसातील द्रवपदार्थांच्या बदलांचे परीक्षण करून कोरोना संक्रमण अधिक सहजपणे शोधता येऊ शकते. या तंत्रज्ञानाच्या मदतीने रुग्णालयांमध्ये चाचणीही करता येते. यासाठी कोणत्याही विशेष प्रयोगशाळेची गरज भासणार नाही. फक्त त्या रुग्णाचा एक्स-रे आवश्यक असेल, असे म्हटले.
आर्यनला जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या स्टॅनफोर्ड विद्यापीठात प्रवेश मिळाला आहे. तर येत्या सप्टेंबरपासून तो तांत्रिक अभ्यासासाठी विद्यापीठात जाणार आहे. तर आर्यनच्या या नव्या निर्मीतीबद्दल कुतूहल व्यक्त केले जात आहे.
Advertisement

Leave a Reply