Take a fresh look at your lifestyle.

20 वर्षाने अमेरीकेची माघार, वाचा काय म्हणाले जो बायडन..

आता, अफगाणिस्तानमध्ये आमची 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपली आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षांनी अफगाणिस्तानातून सैन्य मुदतीत (31 ऑगस्ट)  मागे घेण्याची प्रक्रीय पुर्ण करत असल्याबद्दल सुरक्षादलांचे आभार मानले.

वॉशिंग्टन : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या अमेरीकेवरच दहशतवाद्यांनी निशाना साधला. त्यानंतर अमेरीकेचे जॉर्ज बुश यांनी अनेक मुस्लिम देशांवर हल्ले केले. जागतिक महासत्ता म्हणवल्या जाणारी अमेरीका पुर्णपणे हादरली होती. त्यामुळे लष्करी कारवाईच्या नावाने त्यांनी अफगाणिस्तानमध्ये आपले सैन्य पाठवले. त्यांनी रशियावर नियंत्रण ठेवण्यासाठी अफगाणिस्तानचा वापर केला. तसेच अफगाणीस्तानमध्ये तालिबानी आणि अमेरीकन  सैन्य यांच्यात अनेकवेळा संघर्ष उद्भवला. त्यात अनेक सामान्य अफगाणी नागरीकांना आपला जीव गमवावा लागला. तर अनेक अमेरीकन सैनिकांचा यामध्ये मृत्यू झाला.
डोनाल्ड ट्रम्प अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष असताना त्यांनी अफगाणीस्तानमधील सैन्य माघारीची घोषणा केली होती. परंतू डोनाल्ड ट्रम्प यांचा पराभव झाला आणि जो बायडन अमेरीकेचे राष्ट्राध्यक्ष बनले. त्यांनी २० वर्षापासून अफगाणीस्तानमध्ये असलेले अमेरीकेचे सैन्य माघारी घेण्याचा निर्णय घेतला.
31 ऑगस्ट पर्यंत अमेरीकेचे सैन्य अफगाणीस्तानातून माघारी घेण्याची प्रक्रीया पुर्ण करणार असल्याचे जो बायडन यांनी सांगितले होते. मात्र अफगाणिस्तानातून आपले सर्व सैन्य मागे घेतल्याच्या काही तासांनंतर अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी युद्धग्रस्त अफगाणीस्तान देशातील अमेरिकेची 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपल्याची घोषणा केली.
अफगाणिस्तानमधून अमेरीकी सैन्य माघारी घेण्याचा निर्णय झाल्यानंतर भारतीय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभुमीवर मुजोर तालिबान्यांनी अफगाणिस्तानचा बहुसंख्य भाग ताब्यात घेत सत्ता स्थापन केली. त्यानंतर अफगाणिस्तानमध्ये तालिबान्यांनी क्रुरतेचा कळस गाठला. परंतू अमेरीकेने सैन्य माघारीची प्रक्रीया सुरू ठेवली.
परंतू अमेरीकेच्या सैन्य माघारीनंतर बायडेन म्हणाले, “आता, अफगाणिस्तानमध्ये आमची 20 वर्षांची लष्करी उपस्थिती संपली आहे. तसेच अमेरिकेच्या अध्यक्षांनी अफगाणिस्तानातून सैन्य मुदतीत (31 ऑगस्ट)  मागे घेण्याची प्रक्रीय पुर्ण करत असल्याबद्दल सुरक्षादलांचे आभार मानले. बायडन म्हणाले की, ते मंगळवारी राष्ट्राला संबोधित करणार आहेत.
अमेरिकन सैन्याने काबूल सोडल्यानंतर तालिबानला संपुर्ण अफगाणिस्तानचा ताबा दिला आहे. तसेच बायडन पुढे म्हणाले की, आत्ता मी फक्त एवढेच नमूद करू इच्छितो की, जमिनीवरील स्तरावर उपस्थित असलेले सर्व संयुक्त प्रमुख आणि आमचे सर्व कमांडर यांनी एकमताने आमचे ऑपरेशन नियोजनानुसार पार पाडणार असल्याचे म्हटले होते. आमचे लष्करी ऑपरेशन पूर्ण करणे, तसेच आमच्या सैनिकांच्या जीवाचे रक्षण करणे आणि येत्या आठवड्या किंवा महिन्यांत अफगाणिस्तान सोडण्याची इच्छा असणाऱ्यांचा मार्ग मोकळा असल्याचे म्हटले आहे.
UNSC च्या बैठकीत तालिबानला स्पष्ट संदेश देत अफगाणिस्तानला दहशतवाद्यांचा गड बनवू नका, असा इशारा दिला. तसेच त्यांनी अमेरिकेच्या आंतरराष्ट्रीय सहयोगींशी समन्वय साधणे सुरू ठेवण्यास सांगितले आहे.
Advertisement

Leave a Reply