Take a fresh look at your lifestyle.

अरे बापरे ! Jio बंपर ऑफर, नवीन जिओ फोन मिळणार पूर्णपणे मोफत…वाचा काय आहेत अटी…

1999 रूपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी एकूण 48 GB हायस्पीड डेटा देणार आहे. तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्याद व्हॉईस कॉलची ऑफर आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनी मोफत देण्यात आले आहे.

मुंबई : 5 सप्टेंबर 2016 रोजी Jio सिम लाँच करण्यात आले आणि जिओ (Jio) ने स्पर्धेतील कंपन्यांचे कंबरडे मोडले. जिओ सिमनंतर  2017 मध्ये त्यांनी जिओ फोन लाँच केला.  त्यावेळी ग्राहकांचा विक्रमावर विक्रम जिओने प्रस्थापित केले आणि स्पर्धेतील कंपन्यांना अक्षरशः लोटांगण घालायला भाग पाडले.

Advertisement

आता रिलायन्स जिओने त्यांच्या वेगवेगळ्या ग्राहकांसाठी रिचार्ज योजना आणल्या आहेत. कंपनीने जिओफोन ऑफर 2021 अंतर्गत जिओ फोनच्या ग्राहकांसाठी विशेषतः तीन रिचार्ज प्लॅन लॉन्च केले होते.  त्यामध्ये 1,999, 1,499 आणि 749 रुपयांचे प्लॅन जिओफोन ग्राहकांसाठी जाहीर केले आहेत. तर त्यासाठी एकदा  1,999 रुपयांचा रिचार्ज केल्यानंतर 2 वर्षांपर्यंत रिचार्ज करावे लागणार नाही. 1999 रूपयांच्या या प्लॅनमध्ये कंपनी एकूण 48 GB हायस्पीड डेटा देणार आहे. तर या प्लॅनमध्ये ग्राहकांना अमर्याद व्हॉईस कॉलची ऑफर आणि जिओ अॅप्सचे सबस्क्रिप्शनी मोफत देण्यात आले आहे.

Advertisement

या योजनेची सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे 1,999 रुपयांच्या रिचार्जमध्ये उपलब्ध सर्व सुविधांव्यतिरिक्त, ग्राहकांना जिओ फोनही मोफत मिळतो. परंतू जर तुमच्याकडे फोन नसेल, तर तुम्ही हे रिचार्ज करून घेऊ शकता आणि तुम्हाला फोनद्वारे 2 वर्षांची मोफत सेवा मिळू शकते, असे कंपनीतर्फे सांगण्यात आले आहे.

Advertisement

याशिवाय कंपनीकडे 1,499 रुपयांचा प्लॅनदेखील आहे. या प्लॅनमध्ये एकूण 24 जीबी डेटा मिळणार आहे. याबरोबरच या प्लॅनमध्ये 1 वर्षासाठी अमर्यादित व्हॉईस कॉल आणि जिओ अॅप्सची सुविधा असणार आहे. Jio च्या या प्लॅनमध्ये कंपनी JioPhone मोफत देते. त्याचबरोबर 749 रुपयांच्या जिओफोन प्लॅनमध्ये 1 वर्षाच्या वैधतेसह एकूण 24 जीबी डेटा उपलब्ध आहे.

Advertisement

 

Advertisement
Advertisement

Leave a Reply