Take a fresh look at your lifestyle.

राज्यात पावसाची रिपरिप सुरु, शेतकऱ्यांना माेठा दिलासा, पुढील तीन दिवस पावसाचे..

पुणे : राज्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावल्याने खरीप पिकांना संजीवनी मिळाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यामध्ये समाधानाचे वातावरण आहे. काल (ता. 30) रात्रीपासून पावसाची रिपरिप सुरु आहे. त्यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने, तसेच सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे.

Advertisement

गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने पिके सुकू लागली होती. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला होता. मात्र, पावसाचे परत जोरदार आगमन झाल्याने शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर हसू फुलले आहे. आजही दिवसभर अनेक भागात ढगांच्या गडगडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस असेच हवामान राहणार असल्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे.

Advertisement

राज्यात जोरदार पावसाचा इशारा
मुंबई हवामान विभागाने सॅटेलाईट आणि रडार इमेजेसच्या आधारे, महाराष्ट्रात मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय. पुणे, जळगाव, अहमदनगर, सोलापूर, औरंगाबाद, जालना, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी आणि बीडमध्ये पुढील काही काळात पावसाचा जोर अधिक असेल, असेही नमूद करण्यात आलंय. पालघर, रायगड, ठाणे या कोकणातील भागात विजेचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Advertisement

रायगड, ठाणे आणि नाशिकला अ‌लर्ट
रायगड, ठाणे आणि नाशिक जिल्ह्यांना मंगळवारी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. रत्नागिरी, मुंबई, पालघर, धुळे, नंदुरबार, जळगाव, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, नांदेड, अमरावती आणि नागपूर जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट दिला आहे. 1 सप्टेंबरला राज्यात पालघरला ऑरेंज अ‌लर्ट देण्यात आला असून, मुंबई, ठाणे, रायगड, नाशिक आणि नंदूरबार जिल्ह्यांना यलो अ‌लर्ट दिलाय.

Advertisement

कन्नडमध्ये दरड कोसळली
औरंगाबाद-धुळे महामार्गावरील कन्नड घाटात दरड कोसळली आहे. दरड कोसळून अनेक गाड्या चिखलात फसल्या आहेत. दरड कोसळून रस्ता पूर्णपणे बंद झालाय. अनेक नागरिक घाटात अडकले आहेत. कन्नड घाटात प्रशासनाकडून मदत कार्य सुरू आहे. घाटात अजूनही पाऊस सुरूच आहे.

Advertisement

कन्नड तालुक्यातील अंजना नदीवरील पूलही मुसळधार पावसाने वाहून गेलाय. पळशी बुद्रुक, पळशी खुर्द आणि साखर वेल या गावांचा संपर्क तुटलाय. अंजना नदीला जोरदार पूर आलाय. पुराच्या पाण्यात पूल वाहून गेलाय. पूल वाहून गेल्यामुळे तीन गावांचा संपर्क तुटला.

Advertisement

बीडला पावसाने झोडपलं
बीड जिल्ह्याला मध्यरात्री झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. माजलगाव तालुक्यातील राजेवाडी येथील कुंडलिका नदीला पूर आला आहे. तर आंबेसावळी नदीदेखील खळखळून वाहत आहे. बीडच्या बिंदुसरा नदीलादेखील पाणी आले आहे.

Advertisement

नगरमध्ये सीना नदीला पूर
नगर शहर व परिसरात १२ तासांपासून पावसाची संततधार सुरु आहे. त्यामुळे सीना नदीला पूर आला असून, कल्याण रोडवरील वाहतूक ठप्प झाली आहे. नगर शहरासह परिसरात काल रात्रीपासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरू असून रात्रभर संततधार पाऊस चालू आहे. सकाळीही पावसाचा जोर कायम आहे. जेऊर परिसरात उच्चांकी पावसाची नोंद झाली आहे. राहुरी तालुक्यातही रात्री पासून पावसाची संततधार सुरू आहे.

Advertisement

एअरटेल प्लॅनचे रेट वाढविण्याच्या विचारात.. ग्राहकांच्या खिशाला बसणार झळ..!
बाब्बो ! तब्बल शंभर कोटींच्या दागिन्यांनी सजवले मंदिर, वाचा कोठे आहे अनोखे मंदिर

Advertisement
Advertisement

Leave a Reply